ETV Bharat / city

कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर गोव्यात चर्चच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ - safety

'ईस्टर संडे'च्या दिवशी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र निषेध केला आहे.

कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर गोव्यात चर्चच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
author img

By

Published : Apr 21, 2019, 8:32 PM IST

पणजी - 'ईस्टर संडे'च्या दिवशी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र निषेध केला आहे. त्याबरोबरच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांना गोव्यातील चर्चच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये रविवारी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर गोव्यात चर्चच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले, इस्टर संडेच्या दिवशी करण्यात आलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या पार्श्वभूमीवर गोव्यातील चर्चची सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गोव्याचे आर्च बिशप यांच्याशीही चर्चा करणार आहे. आवश्यकता भासली तर सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:पणजी : इस्टरच्या दिवशी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेल्स यांवर झालेल्या दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध करतो. त्याबरोबर या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांना गोव्यातील चर्चाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

Body:मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, सणाच्या दिवशी करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करतो. या पार्श्वभूमीवर गोव्यातील चर्चची सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गोव्याचे आर्च बिशप यांच्याशीही चर्चा करणार आहे. आवश्यकता भासली तर सुरक्षाव्यवस्थेत अजून वाढ केली जाईल.
गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्यामुळे देशविदेशातील नागरिक वर्षभर भेट देत असतात. तसेच ते चर्चना भेटी देतात. काही वेळा प्रार्थना ही करतात. सध्या पर्यटन हंगाम संपला असला तरीही किनारी भागात अजून अनेक ठिकाणी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत असतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवलेली असते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणेकडून गोव्यातील इस्रायली नागरिकांवर हल्ला होऊ शकतो अशी माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेला सतर्क करण्यात आले होते.
...goa cm dr. pramod sawant नावाने बाईट पाठवला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.