गोवा - महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) काल रात्री उशिरा गोव्यात दाखल झाले. त्यांनी सर्व बंडखोर आमदारांची भेट घेत त्यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठकही घेतली. शिंदे यांना अनपेक्षित रित्या मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे सर्व बंडखोर आमदारांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गोव्यात माघारी येण्यामुळे रात्री हॉटेल परिसरात एकच जल्लोष साजरा ( Celebration in the hotel ) करण्यात आला. यावेळी सर्व आमदारांनी शिंदे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
गोव्याचे मुख्यमंत्री ही भेटीला - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa Chief Minister Pramod Sawant ) यांनी रात्री उशिरा हॉटेल ताजमध्ये जाऊन नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, व त्यांना शुभेच्छा दिल्या. शिंदे गट गोव्यात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री सावंत स्वतः त्यांच्यावरती विशेष नजर ठेवून होते. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी भाजपने प्रमोद सावंत यांच्यावर सोपवली होती. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्यात दाखल झाल्यानंतर सावंत यांच्यासोबत त्यांनी चर्चा करत त्यांचे आभारही मानले.
सर्व बंडखोर आमदार आज दुपारी मुंबईत होणार दाखल - गोव्यात असणारे शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आज दुपारनंतर पुन्हा एकदा मुंबईत दाखल होणार ( rebel MLA will arrive in Mumbai ) आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही त्यांच्यासोबत असतील. दरम्यान, राज्यात भाजप व शिंदे गटाची सत्तास्थापन झाल्यानंतर या सर्व बंडखोर आमदारांची घरवापसी होणार असल्याचे बोलले जात आहे.
श्रीकांत शिंदे गुरुवारी रात्री मुंबईत परतले - महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचे वर्णी लागल्यानंतर त्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे गोव्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. वडिलांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर एक वेगळाच आनंद श्रीकांत शिंदे यांच्या चेहऱ्यावर ती झळकत होता. परंतु त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलण्यास नकार देत मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण केले.श्रीकांत शिंदे बुधवारी रात्री शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत गोव्यात दाखल झाले होते एकनाथ शिंदे गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर श्रीकांत शिंदे वर सर्व बंडखोर आमदारांची जबाबदारी सोपविण्यात आले होते अखेर मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.
हेही वाचा - CM Eknath Shinde : साताऱ्यात जल्लोष; एकनाथ शिंदेंच्या रूपाने चौथा सुपूत्र बनला राज्याचा मुख्यमंत्री