ETV Bharat / city

गोवा : तब्बल ५ महिन्यांनंतर पणजीतील कॅसिनो आणि जलपर्यटन सुरू

पर्यटकांचे आकर्षण असणारे कॅसिनो पाच महिन्यांनंतर पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. सोमवारी सरकारने दिलेल्या आदेशानुसार 50 टक्के क्षमतेने राज्यातील कॅसिनो आणि रिव्हर बोटी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

panji Casino and water tourism news
panji Casino and water tourism news
author img

By

Published : Sep 23, 2021, 11:32 AM IST

Updated : Sep 23, 2021, 7:58 PM IST

पणजी - गोव्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू असणारे कॅसिनो आणि जलपर्यटन मागच्या पाच महिन्यांपासून कोविडमुळे बंद होते. अखेर सोमवारी सरकारने 50 टक्के क्षमतेने जलपर्यटन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मागच्या दोन दिवसांपासून अनेक पर्यटकांची पावले कॅसिनोच्या दिशेने वळण्यास सुरुवात झाली आहे.

व्हिडीओ

पर्यटक आणि कॅसिनो चालकांची प्रतीक्षा संपली -

गोव्याची राजधानी पणजी शहर मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. मांडवी नदीत असणारे कॅसिनो, समुद्राची सफर घडविणाऱ्या बोटी, तसेच बोटीवरील तरंगती हॉटेल ही अनेक पर्यटकांची पसंती असते. त्यातच पणजी हे राजधानीचे व प्रशासकीय शहर असल्याने अनेक पर्यटक रात्रभर कॅसिनोत जात असतात. मात्र, कोविडच्या पहिल्या लाटेत मार्च २०२० मध्ये गोव्यातील पर्यटन ठप्प झाले होते. त्यातच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे पर्यटनासाठी दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली होती. सप्टेंबर २०२० ला सरकारने हळूहळू पुन्हा एकदा पर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, एप्रिल २०२१ नंतर आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा पर्यटनाला खीळ बसली होती. तेव्हापासून राज्यातील पर्यटन बंद होते. कोविडचे लसीकरण सुरू झाल्यानंतर सरकारने हळूहळू राज्यातील पर्यटन पुन्हा एकदा सुरू करण्यास परवानगी दिली होती. पर्यटन सुरू झाल्यावर अनेक पर्यटक गोव्यात दाखल होत होते. पण कॅसिनो आणि जलपर्यटन बंद असल्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होत होता. अखेर सोमवारी सरकारने परवानगी देताच कॅसिनो आणि जलपर्यटन सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या पर्यटक आणि कॅसिनो चालकांची प्रतीक्षा संपली आहे.

तरीही नियम पायदळीच -

सरकारने सोमवारी ५० टक्के क्षमतेने कॅसिनो आणि जलपर्यटन सुरू करण्यास सुरू परवानगी दिली आहे. मात्र, यावेळी काही बंधनेही घातली होती. कॅसिनोत किंवा बोटीत प्रवेश करताना सोशल डिस्टनसिंग बाळगणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझेरचा वापर करणे अशी नियमावली आखून दिली होती. मात्र, कॅसिनोत आणि बोटीत या नियमांना पर्यटक आणि कॅसिनो कर्मचारी पायदळी तुडवत आहेत.

अनेकांचे रोजगार पुन्हा सुरू
कॅसिनोमध्ये हजारो कर्मचारी, टॅक्सी ड्राइवर तसेच हॉटेल विश्वातील अनेक कर्मचारी काम करत असतात. मात्र पर्यटन आणि कॅसिनो बंद असल्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली होती. आता कॅसिनो सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा अनेकांचे रोजगार सुरू होणार आहेत. जलपर्यटन आणि कॅसिनो बंद असल्यामुळे मांडवीच्या तीरावर मागच्या पाच महिन्यापासून नेहमीच अंधार असायचा. मात्र, कॅसिनो आणि जलपर्यटन सुरू झाल्यामुळें आता रस्त्यावर पर्यटकांच्या गाड्याची रात्री उशिरापर्यंत वर्दळ वाढली असून कॅसिनोच्या प्रकाशामुळे मांडविचा परिसर पुन्हा एकदा उजळून निघाला आहे.

हेही वाचा - राज्यपाल निभावत आहेत मदमस्त हत्तीचा रोल, शिवसेनेची केंद्र आणि कोश्यारींवर कडाडून टीका

Last Updated : Sep 23, 2021, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.