ETV Bharat / city

Goa Assembly Elections 2022 : डिचोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला, काँग्रेस कमकुवत

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीकडे ( Goa Assembly Elections 2022 ) देशाचे लक्ष लागलेले आहे. खाणकामासाठी प्रसिद्ध असलेला डिचोली मतदारसंघ ( Bicholim Assembly Constituency ) हिंदुबहुल प्रदेश आहे. यामुळे या ठिकाणी 1994 नंतर भाजप किंवा मगोची सत्ता आहे. सध्या विधानसभेचे सभापती राजेश पाटनेकर हे या मतदारसंघात नेतृत्व करत आहेत.

Goa Assembly Elections 2022
Goa Assembly Elections 2022
author img

By

Published : Dec 15, 2021, 4:03 PM IST

Updated : Dec 15, 2021, 4:48 PM IST

पणजी (गोवा) - गोवा मुक्तीसंग्रामची सुरुवात, गोव्यातील सर्वात हिंदुबहुल प्रदेश म्हणजे डिचोली ( Bicholim Assembly Constituency ). डिचोली तालुका हा खाणकामाच्या विळख्यात अडकलेला तालुका, वर्षानुवर्षे हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.

मतदारसंघातील राजकीय विद्यमान परिस्थिती

1994 नंतर या मतदारसंघात एकदाही काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नाही. मगो किंवा भाजपचाच उमेदवार या मतदारसंघात विजयी झालेला आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजप व मगो यांच्यात कडवी लढत झाली होती. मगोचे नरेश सावळ यांचा अवघ्या काही मतांनी पराभव करण्यात पाटणेकर यांना यश आले होते. यावेळीही राजेश पाटणेकर व मगोचे नरेश सावळ यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. काँग्रेस पक्ष डिचोलीत बराच कमकुवत आहे. तसेच काँग्रेसकडे प्रभावशाली उमेदवारही नाही. मेघश्याम राऊत यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

2017 ची विधानसभा निवडणूक

2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राजेश पाटनेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे उमेदवार नरेश सावळ यांचा पराभव केला. पाटनेकर यांना त्या निवडणुकीत 10 हजार 645 तर 9 हजार 988 मते मिळाली होती. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व आमदार तथा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर हे करत आहेत.

मतदारसंघातील समस्या

मागच्या दोन ते तीन वर्षांपासून खाणकाम बंद असल्यामुळे बेरोजगारी ही येथील मुख्य समस्या आहे. खाणकाम बंद झाल्यामुळे त्यावर अवलंबून असलेले वाहतूक, जहाज बांधणी, खाणकामाची वाहतूक करणारे ट्रक यांना फार मोठा फटका बसला. यावर निगडीत सर्वच व्यवसाय बंद झाले व अनेक लोक बेरोजगार झाले. हा मतदारसंघ बहुतांशी ग्रामीण भागात असल्याने वीज आणि पाण्याची काहीशा समस्या ग्रामीण भागात आजही प्रकर्षाने जाणवतात.

मतदारसंघातील व्यवसाय

खाणकाम हा येथील मुख्य व्यवसाय आहे. पण, मागच्या काही दिवसांपासून तो बंद आहे. शेती, काजू, फळ बागायती व काजूची दारू बनविणे, भात शेती, पशुपालन, औद्योगिक वसाहत हे येथील महत्वाचे व्यवसाय आहेत.

मतदारसंघाची स्थिती
मतदारसंघाची स्थिती

मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार

पुरुषमहिलाएकूण
11 हजार 800 12 हजार 9423 हजार 894

आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार

पक्षउमेदवार
भाजपराजेश पाटनेकर
काँग्रेसमेघश्याम राऊत
महाराष्ट्र गोमंतक पक्षनरेश सावळ

हे ही वाचा - Goa Assembly Election 2022 : गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, आमदार चर्चिल आलेमाव तृणमूलमध्ये

Last Updated : Dec 15, 2021, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.