पणजी - देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र राज्यातील राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. फडणवीस असे नेतृत्व करण्यास तयार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणे गरजेचे आहे असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्राती चालू अलसेल्या राजकिय घडामोडीमुळे त्यांनी फडणीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, सूरतमध्ये शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 32 आमदार होते. त्यानंतर त्यातील 2 आमदार आपली सुटका करुन परतल्याने त्यांच्याकडील आमदारांची संख्या 30 झाली. मात्र त्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे, उदय सामंत यांच्यासह आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे, संजय राठोड हे नॉट रिचेबल झाले. हे सगळेच शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे मानण्यात येत आहे.
हेही वाचा - TMC protest outside Radisson Blu Hotel : बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ.. आंदोलनाला सुरुवात