पणजी (गोवा) - आगामी विधानसभा निवडणुकीत राजधानी पणजीतून बाबुश मोन्सरात यांच्या उमेदवारीवर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. त्यांना बहुमताने निवडून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Goa CM Dr. Pramod Sawant ) यांनी पणजीवासीयांना केली आहे. ( Babush Monserrate will BJP Candidate from Panji )
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघात भाजपच्या वतीने आमदार बाबुश मोन्सरात पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानावर उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंगळवारी रात्री मोन्सरात यांनी एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पणजीतून पुन्हा एकदा मोन्सरात यांना निवडून आणण्याची मागणी पणजीवासियांकडे केली. ( Goa Election 2022 )
हेही वाचा - Goa Assembly Election : गोव्यात राणे पिता पुत्रांचा राजकीय संघर्ष पेटला
गोवा आणि महाराष्ट्राचे अतूट नाते- संजय केळकर
महाराष्ट्र आणि गोव्याचे मागच्या अनेक वर्षांपासून अतूट नाते आहे. गोवा विधानसभा निवडणूक जिंकली की महाराष्ट्र विधानसभा जिंकल्याचा आपल्याला आनंद होईल, असे महाराष्ट्रातील आमदार संजय केळकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील तीनचाकी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
उत्पल परिकर यांना डावलले -
दरम्यान पणजी मतदारसंघात निवडणूक लढविण्यास माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर इच्छुक होते. मात्र, भाजपने बाबूंश मोन्सरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने उत्पल यांचा भाजपने डावलले, अशी चर्चा होत आहे. तर यानंतर आता आगामी काळात उत्पल पर्रीकर कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.