ETV Bharat / city

Goa Assembly Election : प्रचारासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातून कार्यकर्ते गोव्यात दाखल - campaign in Goa

गोव्यात भाषा आणि संस्कृतीमुळे महाराष्ट्र राज्याशी साधर्म्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांना गोव्याची संस्कृती, मंदिरे, समुद्रकिनारे तसेच येथील कोंकणी भाषेविषयी प्रेम आहे. त्यातच 1961 पूर्वी गोवा हा महाराष्ट्र राज्याचाच एक भाग होता. त्यामुळे येथील मराठी भाषिक लोकांना महाराष्ट्र राज्याबद्दल जवळचे नाते आहे.

Goa Assembly Election
Goa Assembly Election
author img

By

Published : Jan 24, 2022, 12:08 PM IST

Updated : Jan 24, 2022, 1:15 PM IST

पणजी - राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळेच सर्वच पक्षांनी आपली प्रचार यंत्रणा मजबूत करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावायला सुरुवात केली आहे. मात्र राज्यात सध्या भाजपा आणि विविध पक्षांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र आणि नजीकच्या कर्नाटक राज्यातून अनेक पदाधिकारी दाखल झाले आहेत. नवी मुंबई येथील प्रचारासाठी गोव्यात आलेल्या भाजपा पदाधिकारी यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने केली खास बातचीत...

प्रचारासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातून कार्यकर्ते गोव्यात दाखल

महाराष्ट्र आणि गोव्याचे नाते आई आणि मावशी सारखे -

गोव्यात भाषा आणि संस्कृतीमुळे महाराष्ट्र राज्याशी साधर्म्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांना गोव्याची संस्कृती, मंदिरे, समुद्रकिनारे तसेच येथील कोंकणी भाषेविषयी प्रेम आहे. त्यातच 1961 पूर्वी गोवा हा महाराष्ट्र राज्याचाच एक भाग होता. त्यामुळे येथील मराठी भाषिक लोकांना महाराष्ट्र राज्याबद्दल जवळचे नाते आहे.

महाराष्ट्र हा नेहमी गोव्याचा मोठा भाऊ -

1961 साली जनमत कौलानंतर गोवा वेगळ्या राज्यात समाविष्ट झाले तरी गोव्याची नाळ अजूनही महाराष्ट्र राज्याशी जोडली गेली आहे. अवघे 18 ते 20 लाख लोकसंख्या असणाऱ्या गोव्यात पन्नास टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक आहेत. त्यामुळेच गोवाकरांसाठी महाराष्ट्र हा नेहमी मोठा भाऊच आहे आणि याच नात्याने महाराष्ट्र राज्यातील लोक गोव्याच्या मदतीसाठी धावत असतात. आत्ता तर गोव्यात विधानसभा निवडणूक सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी गोव्यात प्रचार यंत्रणा राबवित आहेत.

आमदार आणि युवा मोर्चा पदाधिकारी यांच्याकडे जबाबदारी -

राज्यात विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध आमदारांकडे मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. हे आमदार आणि भाजपचे पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघाचा अभ्यास करून तो मतदारसंघ जिंकण्यासाठी नियोजन करत आहेत.

डबल इंजिन सरकारमुळे निवडणूक जिंकणे सोपे जाणार आहे -

राज्यात आणि केंद्रात असणाऱ्या भाजपच्या डबल इंजिन सरकार मुळे मतदारांना भाजपने केलेली विकासकामे त्यांच्यासमोर ठेवून निवडणूक जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे, त्यासाठी आम्ही आमच्या आमदारांच्या विजयासाठी त्याच पद्धतीने जनमानसात प्रचार करत असल्याचे भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले. विक्रांत पाटील आणि त्यांची टीम साळगाव मतदारसंघात आमदार जयेश साळगावकर यांच्यासाठी काम करत आहे.

Last Updated : Jan 24, 2022, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.