ETV Bharat / city

Nashik Crime : म्हसरूळ RTO ऑफिसजवळ तरुणाची हत्या, मृत होत नाही तोपर्यंत घातले घाव - Youth murder in nashik

म्हसरूळमधील नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात पुन्हा एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका आठवड्यातील खुनाची ही दुसरी घटना आहे. या सर्व प्रकरणांचा नाशिक पोलीस(Nashik Police) तपास करत आहेत.

Youth murder
खून झालेला तरुण
author img

By

Published : Nov 24, 2021, 2:57 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये खुनाचे(Nashik Murder) सत्र सुरूच आहे. शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस पुत्राचा म्हणजेच गुन्हेगार प्रवीण काकड याचा त्याच्याच मित्रांनी वर्चस्व वादावरून खून केल्याचे दिसून आले होते. त्या गोष्टीला काही तास उलटत नाही तर लगेचच म्हसरूळमधील नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात पुन्हा एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत होत नाही तोपर्यंत घातले डोक्यावर दगडाने घाव -

राजेश शिंदे (रा. भराडवाडी, फुलेंनगर) याची मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली आहे. राजेश हा भराडवाडी शाहू नगर सप्तरंग सोसायटीच्या मागे आरटीओ ऑफिस येथे राहात होता. त्याचे भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीचे छोटे दुकान होते. हा खून देखील वर्चस्व वादातून झाल्याचे समजत आहे. हल्लेखोरांनी हल्ला केल्यावर जोपर्यंत त्यांना तो मृत आहे समजत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यात व चेहऱयावर दगडाने मारत होते. जेव्हा त्यांना व्यक्ती मृत झाल्याची खात्री पटली तेव्हा त्यांनी तेथून पळ काढला व फरार झाले. मारेकरी नेमके कोण आहे? हे अजून समजले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दोन्हीही घटनेनंतर म्हसरूळ पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह -

या दोन्ही खुनाच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीती पसरली असून, वर्चस्व वादाच्या या भोवऱ्यात नेमके वर्चस्व नाशिक पोलिसांचे की नाशिकमधील गुन्हेगारांचे या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.