ETV Bharat / city

नाशकात धारदार शस्त्रांने वार करून युवकाचा खून

नाशिक शहरातील द्वारका भागाजवळ महालक्ष्मी चाळ आहे. या चाळीत कामगार वर्ग वास्तव्यास आहे. सोमवारी मध्यरात्री अचानकपणे दोन गट आपआपसात भिडले.

नाशकात धारदार शस्त्रांने वार करून युवकाचा खून
नाशकात धारदार शस्त्रांने वार करून युवकाचा खून
author img

By

Published : Feb 9, 2021, 5:19 PM IST

नाशिक - परिसरातील द्वारकेजवळील महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दंगल उसळली. यावेळी दंगलखोरांच्या परस्परविरोधी गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यावेळी आकाश संतोष रंजवे (२६) या युवकाला चॉपरचा छातीवर घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच ठार झाला.

तर करण लोट या युवकावरही दंगलखोरांनी शस्त्रांनी हल्ला चढवून गंभीररित्या जखमी केले. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच ते सहा संशयित दंगलखोरांना ताब्यात घेतले आहे.

अचानकपणे दोन गट आपआपसात भिडले-

शहरातील द्वारका भागाजवळ महालक्ष्मी चाळ ही वसाहत आहे. या वसाहतीत कामगार वर्ग वास्तव्यास आहे. सोमवारी मध्यरात्री अचानकपणे दोन गट आपआपसात भिडले. 'तु मेरी पुलीस को टिप क्यू देता हैं' असा जाब विचारत संशयित विशाल बेनवाल व त्याच्या साथीदारांनी आकाश व करण लोट यांना शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित बेनवालसह सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बेनवाल, हरिष पवार, मनीष दुलगज, शिवम पवार आदींनी येऊन शिवीगाळ करत धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यावेळी रंजवे यास छातीवर वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर करण हा गंभीरपणे जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

फरार समाजकंटकांचा पोलीस घेत आहेत शोध-

महालक्ष्मी चाळीत सशस्त्र धुमश्चक्री उडाल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दंगलखोरांपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या दंगलखोरांवर खून, प्राणघातक हल्ला व दंगल माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दंगलीमध्ये सुमारे दहा ते बारा संशयितांचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. फरार समाजकंटकांचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा- शहांनी कितीही ताकद पुरवली तरी शिवसेना नारायण राणेंना धुळ चारेल - वैभव नाईक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.