नाशिक : नाशिक येथील ॲडव्हेंचर पार्कमध्ये पर्यटक महिला साहसी खेळ करताना 25 फुटांवरून ( Woman Injured in 25 Foot Fall ) कोसळून जखमी झाली. महिलेला तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. रुग्णालयात आलेला लाखो रुपयांचा खर्च त्यामुळे महिलेने ग्राहक न्यायालयात ( Consumer Court of Nashik ) दावा दाखल केला. त्याच पार्श्वभूमीवर व्हेंचर पार्कमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली नसल्याचा ठपका ठेवत नाशिकच्या ग्राहक न्यायालयाने ॲडव्हेंचर पार्क चालकाला माहिलेला 13 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निकाल दिला ( Adventure Park Driver Fined 13 Lakhs ) आहे.
राईड करताना सुरक्षेसाठी कुठलीही उपाययोजना नाही : 29 डिसेंबर 2019 रोजी सिद्धी पारख या महिला नाशिक येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेल्या होत्या. त्या पार्कमध्ये झीपलाइन राइड करताना प्रशिक्षकाने हर्नस लावले. राईड करताना केबलला हुकने लटकवले, अशात त्यांना राईट सुरक्षेसाठी हेल्मेट कॅप दिलेली नव्हती. तसेच, बेल्ट नीट बांधला गेला नव्हता. त्यामुळे सिद्धी या 25 फूट उंच गेल्यानंतर त्यांचा बेल्ट तुटला आणि त्याखाली कोसळल्या.
![While riding the zipline](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-adventureparkaccident-7204957_05082022200358_0508f_1659710038_1058.jpg)
उपचाराकरिता आला 12 लाख रुपये खर्च : त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सोबतच्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी रिसॉर्टकडून कुठल्याही प्रकारची मदत त्यांना झाली नाही. त्या गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना शस्त्रक्रियेसाठी मुंबईला नेण्यात आले. या काळात त्यांना उपचारासाठी 12 लाख 32 हजार खर्च आला होता. यानंतर त्यांनी रिसॉर्ट विरोधात ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता.
![Consumer Court of Nashik](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-adventureparkaccident-7204957_05082022200358_0508f_1659710038_759.jpg)
न्यायालयाने काय दिला निकाल : रेन फॉरेस्ट रिसॉर्टचे मालक अवतारसिंह सेठी ( Avtarsinh Sethi ) यांना पर्यटक महिला सिद्धी पारख यांना उपचाराकरिता खर्च 12 लाख 32 हजार, शारीरिक व मानसिक त्रासापोटी 1 लाख 50 हजार रुपये असे 13 लाख 82 हजार रुपये, तसेच तक्रार अर्जाचा खर्च 25 हजार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
हेही वाचा : Commonwealth Games 2022 : साक्षी मलिकने कुस्तीत जिंकले सुवर्ण पदक; कनाडाच्या एन्ना गोंजालेसचा केला पराभव