ETV Bharat / city

Bipin Rawat chopper crash : बिपीन रावत यांचा प्रत्येक क्षण देशासाठी होता - डॉ. माधुरी कानिटकर - CDS Bipin Rawat Chopper Crash Tamil Nadu

बिपीन रावत ( CDS Bipin Rawat Chopper Crash Tamil Nadu ) यांचा प्रत्येक क्षण देशासाठी होता, अशा शब्दात नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर ( Dr. Madhuri Kanitkar on Bipin Rawat death ) यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आयडीएसमध्ये गेली दोन वर्ष कानिटकर यांनी रावत यांच्यासोबत काम केले आहे.

Bipin Rawat
Bipin Rawat
author img

By

Published : Dec 9, 2021, 3:54 PM IST

Updated : Dec 9, 2021, 5:38 PM IST

नाशिक - मातृभूमीसाठी डोळ्यात तेल घालून कार्य करणाऱ्या प्रत्येक सैनिकांबद्दल बिपीन रावत यांना कमालीची आत्मीयता होती. कोविड काळात तर सैनिकांची विशेष काळजी घेण्यासाठी ते नेहमीच संपर्कात रहायचे. त्यांच्याशी नेहमी बोलणं व्हायचं. माझा प्रत्येक क्षण देशासाठी असेच ते नेहमी म्हणत, असे मत नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आणि माजी निवृत्त लेफ्टनंट जनरल (Former Lt General) डॉ. माधुरी कानिटकर (Dr. Madhuri Kanitkar on Bipin Rawat death) यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. माधुरी कानिटकर यांची प्रतिक्रिया

बुधवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने अवघा देश हादरून गेला आहे. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. यावेळेस त्यांच्या सहकारी असलेल्या माजी निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि आता नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आयडीएसमध्ये गेली दोन वर्ष कानिटकर यांनी रावत यांच्यासोबत काम केले आहे.

35 हजार रुग्णांवर यशस्वी उपचार

सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूने मोठा धक्का बसल्याचं निवृत्त लेफ्टनंट जनरल तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर यांनी म्हटलं आहे.त्यांच्यामुळे सैन्यदलाने कोविड काळात उभारलेल्या केंद्रात 35 हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करता आले. त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रत्येक क्षण आत्मविश्वास निर्माण करणार होता. सामाजिक कार्य, सैन्यदलातील मुलांसाठी उपक्रम, तसेच कॅन्सरग्रस्त यासाठी विविध कामात त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या सोबतही खूप काम केलं. माझे पती आणि रावत हे एकाच एन.डी. पासूनचे बॅचमेट होते. त्यामुळे रावत यांचे जाणे देशासाठी नुकसान असलं तरी आमच्यासाठी ते वैयक्तिक आहे. रावत सरांकडून मला खूप शिकायला मिळाले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना असा शेवटचा निरोप घ्यायला लागेल हे अत्यंत धक्कादायक आहे, मत डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Bipin Rawat chopper crash : लष्करप्रमुख जनरल नरवणे होणार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ?

Last Updated : Dec 9, 2021, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.