ETV Bharat / city

कोरोनाच्या कुठल्याही व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय - छगन भुजबळ - कोरोना नियंत्रण

कोरोना आणि त्या संबंधीच्या विविध विषाणूंचा सामना करण्यासाठी वेळीच लसीकरण केल्यास नागरिकांची प्रतिकार शक्ती निश्चितच वाढण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाचा पहिला डोस नागरिकांना उपलब्ध होईल यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय - छगन भुजबळ

author img

By

Published : Aug 7, 2021, 4:30 PM IST

नाशिक : कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाच्या कुठल्याही व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणावर भर देऊन लसीकरणाची गती वाढविण्यात यावी,अशा सूचना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

लसीकरण हाच मार्ग
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे झाले आहेत. परंतू कोरोनाशी संबंधित असणाऱ्या विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी केली जाऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील डेल्टा तपासणी करण्यात येऊन संबंधित रुग्णांवर वेळेत आवश्यक उपचार करावेत. कोरोना आणि त्या संबंधीच्या विविध विषाणुंचा सामना करण्यासाठी वेळीच लसीकरण केल्यास नागरिकांची प्रतिकार शक्ती निश्चितच वाढण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाचा पहिला डोस नागरिकांना उपलब्ध होईल यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

कोरोना नियमांचे पालन करा
विषाणू कोणताही असो, त्यापासून स्वत: सोबत आपल्या कुटूंबाचा व निकटवर्तीयांचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे देखील गरजेचे आहे. या अनुषंगाने कोरोनाची भीती पूर्णत: संपलेली नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

31 ऑक्सिजन प्लांट
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सादर करताना सांगितले की, जिल्ह्यात ग्रामीण भागात 24 व शहरी भागातील 13 ठिकाणी अशा एकूण 37 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम 31 ऑगस्टअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीवर भर देण्यात यावा, या राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील 23 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे सिव्हिल काम पूर्ण झाले असून 12 प्रकल्पांचे स्थापित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण होऊन आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्याचा पॉझिव्हिटी दर आता अत्यल्प झाला असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात एक हजार 59 रुग्णा उपचार घेत आहेत, असे जिल्हाधिकरी मांढरे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीच्या वेळी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.

हेही वाचा - जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लशीला भारताकडून परवानगी, जाणून घ्या लशीचे वैशिष्ट्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.