नाशिक - राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्मचाऱ्यांना फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलावे, असे फर्मान सोडल्यानंतर राजकारणात वादंग निर्माण झाले. विरोधकांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा विरोध केला तर काही नेत्यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन केले. फोनवर हॅलो बोलण्यापेक्षा वंदे मातरम बोलणे योग्य आहे. हॅलो हा इंग्रजी शब्द आहे. त्यामुळे मराठीत वंदे मातरम बोलायला पाहिजे. मुनगंटीवारचे बोलले त्यात गैर नाही असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले Union Minister Ramdas Athawale यांनी मांडले आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी झाली आहे पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही आठवले यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षाला राज्यात एक मंत्रिपद मिळावे ही आमची मागणी आहे. तसेच 12 आमदारांच्या यादीत आम्हाला देखील स्थान मिळावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 2024 मधील निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील. भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी पंतप्रधान काम करत आहेत. घराणेशाही विरोधात मोदी काम करत आहेत. अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. मराठा समजला आरक्षण मिळाले पाहिजे हा आमचा प्रयत्न ओबीसी समजला देखील राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असेही यावेळी रामदास आठवले म्हणाले.
'शिवसेना शिंदेंची' : शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नेते आले आहेत. फडणवीस यांनी मोठे मन करून जागा जास्त असताना देखील शिंदे यांना मुख्यमंत्री केले. खरी शिवसेना हे शिंदे यांचीच आहे, असा निकाल निवडणूक आयोग लवकर देऊ शकते, असे भाकीत आठवले यांनी केले. 2/3 आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेना चिन्ह शिंदे यांना मिळणार असल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले.
हेही वाचा - Deputy CM Devendra Fadnavis पावसाळी अधिवेशन संपताच शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत सुरू होईल