ETV Bharat / city

मनमाडला कोरोनाचे द्विशतक; 21अहवाल पॉझिटिव्ह - nashik municipal corporation corona latest news

मनमाड शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असुन सामूहिक संसर्ग वाढत आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, महावितरण कंपनी, उपजिल्हा रुग्णालयापाठोपाठ आता मनमाड नगर पालिकेत देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिकेच्या चार अधिकऱ्याना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाले तोच आज 21 नवीन अहवाल प्राप्त झाले आहेत.

manmad nagar parishad
manmad nagar parishad
author img

By

Published : Jul 30, 2020, 10:58 AM IST

मनमाड (नाशिक) - मनमाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, महावितरण कंपनी, उपजिल्हा रुग्णालयापाठोपाठ आता मनमाड नगर पालिकेतदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिकेच्या चार अधिकाऱ्यांचे काल (बुधवार) सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असताना आज पुन्हा 21 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचे मनमाडला द्विशतक पूर्ण झाले असून येथे कोरोनाचे 211 रुग्ण झाले आहेत.

मनमाड शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असुन सामूहिक संसर्ग वाढत आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, महावितरण कंपनी, उपजिल्हा रुग्णालयापाठोपाठ आता मनमाड नगर पालिकेतदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिकेच्या चार अधिकऱ्याना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाले तोच आज 21 नवीन अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मनमाड शहरात कोरोनाचे द्विशतक पूर्ण केले आहे. शहरातील कोरोनाबधितांची संख्या 211 झाली असून यापैकी 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 137 जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित 68 जणांना सध्या कोव्हिड सेंटरमधून उपचार देण्यात येत आहे.

मनमाड शहरातील लोकसंख्या बघता हे आकडे कमी असले तरी भविष्यात येथून कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनमाडला जवळपास एक लाख चाळीस हजाराच्यावर लोकसंख्या आहे. येथून सामूहिक संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.