ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 यंदा सोने चांदीचे पूजा साहित्य वाढणार बाप्पाचा थाट

author img

By

Published : Aug 27, 2022, 12:51 PM IST

31 ऑगस्ट रोजी घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन Arrival of Ganaraya होणार असून त्याच्या स्वागतासाठी सर्वच आतुरले आहेत. बाप्पाच्या आदरातिथ्यात कमी राहू नये, यासाठी सोने ,चांदीचे साहित्य खरेदी Purchase of silverware करण्यासाठी भाविकांची दुकानात गर्दी होत आहे. सोने, चांदीचे भाव वाढलेले असले तरी लाडक्या बाप्पाचे लाड पुरविण्यासाठी भाविक या वस्तू खरेदी करण्यासाठी पसंती देत आहे.

Ganeshotsav
गणेशोत्सव

नाशिक भक्तांचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी लाडक्या गणरायाचे आठवडाभरात आगमन Arrival of Ganaraya होणार असून त्याच्या स्वागतासाठी अबालवृद्ध आतुरले आहेत. गणरायाच्या आदरातिथ्यात कमी राहू नये, यासाठी सोने,चांदीचे साहित्य खरेदी Purchase of silverware करण्यासाठी भाविकांची दुकानात गर्दी होत आहे. सोने, चांदीचे भाव वाढलेले असले तरी लाडक्या बाप्पाचे लाड पुरविण्यासाठी भाविक या वस्तू खरेदी करण्यासाठी पसंती देत आहे.

यंदा सोने चांदीचे पूजा साहीत्य वाढणार बाप्पाचा थाट

सोने,चांदीचे वस्तू
गणेश मूर्ती, आरास, प्रसाद यांचे नियोजन केले जात आहे. अशा या लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी सोने,चांदीच्या वस्तू खरेदीला भाविक पसंती देत आहेत.यंदाही विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. लहान, मोठ्या आकाराची सोने, चांदीची गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे गेल्या काही वर्षांपासून भाविकांचा ओढा वाढू लागला आहे. त्याचबरोबर चांदीच्या वस्तुंमध्ये जास्वंदीचे फुल, दुर्वांचा हार, विडा सुपारी, मोदक, मोदकांची रास, तुळशी वृंदावन, केवड्याचे पान, निरांजणी, दिवा,पंचपाळे, गणेशाचे वाहन उंदिरमामा,बाजूबंद यासह पाट, ताम्हण, पेला,त क्क्यापळी यांसारख्या वस्तू विविध आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.तसेच सोन्या मध्ये गणेश मूर्ती, मोदक,दुर्वा, फुल, मोरपीस अशा वस्तू उपलब्ध आहेत.अनेक ग्राहकांनी गुरुपुष्यामृताचा योग साधत या वस्तू खरेदी केल्या आहेत.

दरवर्षी चांदीच्या वस्तू घेतो
आम्ही बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघतोय,दरवर्षी आम्ही काही ना काही चांदीच्या वस्तू बाप्पाच्या पूजेसाठी घेत असतो,यंदा आम्ही बापासाठी मुकुट घेतला आहे,हा मुकुट आमच्या बाप्पावर उठून दिसेल असं एक महिला भाविकांने सांगितले आहे.

सध्या सोन्याचे भाव
सोन्याचे भाव 48 हजार 690 10 तोळे

चांदी 57 हजार 500 प्रति किलो

हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 गणेश मूर्तीची स्थापना करण्याचा हाच शुभ मुहूर्त आणि मार्ग, जाणून घ्या गणेश चतुर्थीची सुरुवात कशी झाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.