ETV Bharat / city

नाशकात माेबाईल दुकान फाेडले, चाेरटा सीसीटीव्हीत कैद - नाशकात माेबाईल दुकान फाेडले

नाशिकरोड येथे रविवारी मध्यरात्री चोरट्याने दुकानाच्या वरचा पत्रा फोडून आत प्रवेश करत दुकानातील मुद्देमाल लंपास केला. हा चोर, चोरी करत असताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या चोरीमुळे दुकान मालकाचे नुकसान झाले आहे. भर चौकात झालेल्या या चोरीने आजूबाजूच्या व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

thief breaking mobile shop caught in cctv at nashik
नाशकात माेबाईल दुकान फाेडले
author img

By

Published : Jul 21, 2022, 3:29 PM IST

नाशिक - नाशिकरोड येथील शिवाजी पुतळ्याजवळ मध्यवर्ती चौकातील फोन सर्व्हिसेस या मोबाईल दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली. या चोरीमध्ये दुकानातील 30 नवीन मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लुटूथ यासह 20 मोबाईल डिस्प्ले चोरी करण्यात आले. ही चोरी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. भरवस्तीत केलेल्या या धाडसी चोरीमुळे नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे.

चोरट्याने दुकानाच्या वरचा पत्रा फोडून आत केला प्रवेश - नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी चोरी झाल्याने चोरांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. नाशिकरोड येथे रविवारी मध्यरात्री चोरट्याने दुकानाच्या वरचा पत्रा फोडून आत प्रवेश करत दुकानातील मुद्देमाल लंपास केला. हा चोर, चोरी करत असताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या चोरीमुळे दुकान मालकाचे नुकसान झाले आहे. भर चौकात झालेल्या या चोरीने आजूबाजूच्या व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.