ETV Bharat / city

Woman Fell Into Well : नाशिक पाणीटंचाईच्या झळा, पाणी भरताना महिला पडली विहिरीत

author img

By

Published : Jun 7, 2022, 1:44 PM IST

Updated : Jun 7, 2022, 2:26 PM IST

नाशिकच्या पेठ तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायत अंतर्गत असणारे बोरीचीबारी या गावात उन्हाळ्यात कायम स्वरूपी पाणीटंचाई असते. आजपर्यंत या गावची पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर कोणतीही खास उपाययोजना आखण्यात आली नाही. येथील गावालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीत प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे दररोज पाणी टाकले जाते. 6 जून रोजी जयश्री भोये (३७) या पाणी भरत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. ( woman fell into well in Nashik )

woman fell into well in Nashik news
पाणी भरताना महिला पडली विहिरीत

नाशिक - नाशिकच्या पेठ तालुक्यातील काही भागात भीषण पाणी टंचाई ( Nashik water crisis ) जाणवत आहे. अशात बोरीचीबारी या गावात जयश्री भोये या पाणी भरत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याची ( woman fell into well in Nashik ) घटना घडली आहे. आजुबाजुला असलेल्या महिलांनी आरडा ओरडा केल्याने तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेत दोराच्या सहाय्याने या महिलेस विहिरीतून बाहेर काढले आहे.

पाणी भरताना महिला पडली विहिरीत

नाशिकच्या पेठ तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायत अंतर्गत असणारे बोरीचीबारी या गावात उन्हाळ्यात कायम स्वरूपी पाणीटंचाई असते. आजपर्यंत या गावची पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर कोणतीही खास उपाययोजना आखण्यात आली नाही. येथील गावालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीत प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे दररोज पाणी टाकले जाते. 6 जून रोजी जयश्री भोये (३७) या पाणी भरत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.

आजुबाजुला असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेत दोराच्या सहाय्याने यामहिलेस विहिरीतून बाहेर काढले. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोरीचीबारी येथील पाणी टंचाई कायम स्वरूपी दूर करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.

या गावात सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा - नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांची संख्या 125 पर्यंत पोहोचली आहे. टँकरची संख्या आठवड्याभरात 49 वरून 58 पर्यंत गेले आहे. जिल्ह्यात 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक 45 गावात 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा होते आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील 9 तालुक्यात 87 गावांमधील 42 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या अधिक आहे.

हेही वाचा - MLC Election 2022 : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर व आमशा पाडवी यांना उमेदवारी

Last Updated : Jun 7, 2022, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.