नाशिक - अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या संबंधित व्यवहाराबाबत ( Minister Nawab Malik Case ) चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचे पथक ( ED inquiry in Nashik ) नाशिकच्या एका भंगार व्यवसायिकाची चौकशी केली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. यामुळे सातपूर अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमधील ( Scrap Market ) भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
नेहमीच चर्चेतला भंगार बाजार - सातपूर अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार व्यवसाय विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई होऊनही हा भंगार बाजार अजूनही तसाच आहे. भंगार मार्केटधील विक्रेत्यांचे संबंध उत्तर भारतीय नेत्यांशी आहे. तसेच अबू आझमी, कृपा शंकर सिंग, नवाब मलिक यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचे नातेवाईक या व्यवसायात असल्याचे बोलले जाते. भंगार व्यवसायातून मिळणारा आर्थिक लाभामुळे स्थानिक प्रशासनही कारवाई करताना हात आखडत असतात.
मुलाच्या संपत्तीची चौकशी - मंत्री नवाब मलिक यांच्यावरील 'ईडी'ची कारवाईच्या चौकशीत नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड पुन्हा चर्चेत आला आहे. मलिक व त्यांच्या मुलांच्या व अन्य नातेवाइकांच्या नावाने असलेल्या संपतीबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. यात नाशिक, मुंबई, कोकण तसेच औरंगाबाद येथील संपत्तीबाबत चौकशी करण्यासाठी एक पथक नुकतेच नाशिकमध्ये आले असल्याचे समजते. यात छोट्या मोठ्या कंपन्यांतील भंगार व्यवहार तसेच सातपूर अंबड लिंक रोडवरील काही व्यावसायिकांची चौकशी केल्याचे ( ED inquiry in Nashik ) समजते. यामुळे सातपूर अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमधील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा - Nashik Crime News : रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीचा मोबाईल हिसकावला; पहा व्हिडिओ