नाशिक - गेल्या काही दिवसांपासून नाशिक मध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, पुरवठा कमी होत असल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बाजार समिती मध्ये एक किलो लिंबू 150 ते 170 रुपये विकला जात आहे. तर, किरकोळ बाजारात ग्राहकाला एका लिंबू साठी 10 रुपये मोजावे लागत ( Lemon Price Increases ) आहे.
महाराष्ट्र राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. अनेक शहरांत उन्हाचा पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. त्यात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सर्वसामान्य माणसांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशात उन्हाळ्यात लिंबूची मागणी वाढली आहे. एका लिंबूसाठी ग्राहकांना 10 रुपये मोजावे लागतात आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने लिंबूच्या दारात वाढ झाली आहे. महिन्याभरापूर्वी नाशिकच्या बाजार समिती मध्ये 90 ते 100 रुपये किलोने विक्री होणारे लिंबासाठी आता ग्राहकांना 150 ते 170 मोजावे लागत आहे.
...म्हणून महागले लिंबू - महाराष्ट्रात अहमदनगर, चव्हाळा,पिंपरी, धानोरा गुरव, पहूर, पापळ, जामगाव, नांदसावंगी या भागात लिंबाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. पण यंदाच्या वर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात लिंबूला सर्वच ठिकाणाहून अधिक मागणी आहे. उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्याने लिंबाचे दर वाढले आहे. नाशिक मध्ये सहा महिन्यांपूर्वी ग्राहकांना किरकोळ बाजारात 10 रुपयात 5 ते 7 लिबू मिळतं होते त्याच एका लिंबूसाठी ग्राहकांना आता 10 रुपये मोजावे लागत आहे.
औषधी गुणधर्म - लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यासाठी आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करतात. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे.
हेही वाचा - Satish Uke Case : सतीश उकेंना मोठा धक्का; 11 एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ