ETV Bharat / city

आत्मनिर्भर भारत; विनातारण कर्जातून देशातील उद्योगांना मिळाली चालना..

author img

By

Published : Jun 19, 2020, 7:24 PM IST

लॉकडाऊनमुळे देशातील लहान, मोठे उद्योग अडचणीत सापडले होते. भारतातील औद्योगिक कृषी व्यवसाय पुन्हा एकदा सुरळीत व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 लाख करोड रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मागील आठवड्यापर्यंत देशात 5 लाख 46 हजार 617 उद्योजकांना आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत 24 लाख 360 करोड रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.

nashik
संग्रहित छायाचित्र

नाशिक - देशात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील लहान, मोठे उद्योग अडचणीत सापडले होते. भारतातील औद्योगिक कृषी व्यवसाय पुन्हा एकदा सुरळीत व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 लाख करोड रुपयांचे पॅकेज जाहीर केले. याचाच एक भाग म्हणून देशातील अडचणीत सापडले मोठे, सूक्ष्म, लघु उद्योगांना चालना मिळावी यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 लाख करोड विनातरण लोन देण्याची घोषणा केली असून याचा लाभ आता उद्योजकांना होत आहे. मागील आठवड्यापर्यंत देशात 5 लाख 46 हजार 617 उद्योजकांना आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत 24 लाख 360 करोड रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 12 लाख 200 करोड रुपयांचा वापर उद्योजकांनी आपल्या व्यवसायासाठी केला आहे. महाराष्ट्रतील 17 हजार 911 उद्योजकांना 2 हजार 202 करोडचे विनातारण कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

आत्मनिर्भर भारत; विनातारण कर्जातून देशातील उद्योगांना मिळाली चालना..

नाशिक जिल्ह्यातील उद्योगांना मिळणार चालना...

नाशिक जिल्ह्यात लहान, मोठे असे जवळपास 4 हजार उद्योग असून यातील सर्वधिक उद्योग ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी निगडित आहेत. मुंबई, पुणेनंतर तिसऱ्या नंबरचे औद्योगिक क्षेत्र नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्राचे 2 हजार कोटींहुन अधिक नुकसान झाले. मात्र आता अनलॉक सुरू झाल्याने नाशिकमधील सर्वच कंपन्या सुरू झाल्या आहेत. मात्र तरी सुद्धा बाहुतांश मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांना कामगार आणि कच्च्या मालाचा प्रश्न भेडसावत असल्याने आत्मनिर्भर भारत योजना अंतर्गत विनातारण कर्जाचा लाभ मिळाल्याने त्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

कर्ज मिळाले म्हणून व्यवसायाला गती आली...

मार्च महिना हा उद्योकांसाठी वर्षांचा शेवटचा महिना असतो. खरं तर या काळात माल पाठवणे आणि विकलेल्या मालाचे पैसे मिळत असतात. मात्र याच महिन्यात लॉकडाऊन आल्याने या सर्व गोष्ट थांबल्या. सर्वच बंद असल्याने दुसरी हालचाल देखील करता आली नाही. अशा परिस्थितीत अडकलेले पैसे कोण देईल, अशी देखील आशा नव्हती. मात्र अनलॉक झाल्यानंतर कंपनी सुरू करण्याची वेळ आली. मात्र आमच्याकडे कामगारांना देण्यासाठी आणि कच्चा माल खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता. मात्र आत्मनिर्भर योजनेतून आम्हाला दिलासा मिळाला. आमचे बँकेत 25 लाखांचे सीसी लोन आहे. आम्ही बँकेकडे 8 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी त्यांनी 70 टक्के म्हणजे 5 लाख रुपये कर्ज आम्हाला दिले आहे. पुढील वर्षभर कुठलेच पैसे भरायचे नसून दुसऱ्या वर्षी 12 हप्त्यामध्ये आम्ही हे कर्ज फेडणार आहे.

देशातील कुठल्या नॅशनल बँकांनी किती कर्ज वाटले...

बँक ऑफ बडोदा 1893.53 करोड

बँक ऑफ इंडिया 847.47करोड

बँक ऑफ महाराष्ट्र 477.16 करोड

सेंट्रल बँक 1171.43 करोड

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 1007.75 करोड

इंडियन ओव्हरसीस बँक 321.65 करोड

पंजाब अँड सिंडीकेट बँक 95.38 करोड

पंजाब नॅशनल बँक 1772.39 करोड

स्टेट बँक ऑफ इंडिया 13363.22 करोड

युसीओ बँक 451.52 करोड

युनियन बँक ऑफ इंडिया 1841.95 करोड

एकूण 24260.65 करोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.