नाशिक - नाशिकमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थीसह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुतांश शाळेत थर्मल चेकिंग करून विद्यार्थ्याना शाळेत प्रवेश देण्यात आला. आज नाशिक जिल्ह्यातील शासकियसह खाजगी शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी विशेष तयारी केली होती. शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना आनंदीत करणारे कार्टून पोस्टर लावण्यात आले होते. तसेच रांगोळ्या काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कुठे गुलाब फुल देवुन, तर कुठे मुलांचे औक्षण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांने1 बरोबर पालकांमध्ये ही आनंदाचे वातावरण दिसून आले.
मित्र भेटण्याचा आनंद - गेले दोन वर्ष मुलांचे शाळा विश्व ठप्प झाले होते. शाळा ऑनलाइन सुरू असल्या तरी या रोजच्या दिनक्रमापासून, शाळेच्या उत्साही वातावरणापासून, मित्रमैत्रिणी, शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले होते. परंतु, आता दररोज मित्र मैत्रिणी भेटणार आहेत, शिक्षकांनाही गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती. त्यामुळे शिक्षकही कमालीचे खुश दिसून आले.
विद्यार्थी खुश - गेल्या दोन वर्षापासून मुले कोरोनामुळे मोबाईलमध्ये अडकून गेली होती. पण आज खूप दिवसांनी पून्हा शाळेत आल्यावर ती खूप उत्साही होती, आनंदी होते. त्यांना शिक्षकांशी भेटून, मित्रांशी भेटून आनंद झाला. शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना भेटून आनंदी असल्याचे दिसून आले. ऑनलाईन शिक्षणामुळे दोन वर्षे मोबाईल शिक्षणामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये थेट संवाद झाला नाही. त्यामुळे काही विषय मागे राहिले आहे. ते विषय आता भरून निघतील असा विश्वास भोसला स्कुलच्या प्राचार्य अंजली सक्सेना यांनी सांगितले.
हेही वाचा - Trainee nurse commits suicide : नाशिकात प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या
हेही वाचा - Rahul Gandhi ED Enquiry : राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी, ईडी कार्यालयात दाखल