ETV Bharat / city

Nashik School Start : शालेय साहित्याच्या किंमतीत 30 ते 35 टक्के वाढ; पालकांच्या खिशाला भुर्दंड - नाशिक शालेय साहित्य किंमतीत वाढ

नवीन शैक्षणिक वर्षाला १३ जूनपासून प्रारंभ होणार असल्याने शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.

Nashik School Start
Nashik School Start
author img

By

Published : Jun 10, 2022, 4:42 PM IST

येवला ( नाशिक) - नवीन शैक्षणिक वर्षाला १३ जूनपासून प्रारंभ होणार असल्याने शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.

प्रतिक्रिया

शालेय साहित्य किंमतीत वाढ - कोरोनामुळे दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. इंधन दरवाढ, मजुरी वाढ,वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किंमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले आहे. वह्यांच्या किंमतीत मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी 300 रुपये डझन असणाऱ्या वह्या आता 400 ते 450 रुपयांवर गेल्या आहेत. तसेच पाच रुपयांना मिळणारा साधा पेन आता सात रुपयांना मिळत आहेत. दुसरीकडे पालक जुन्या दराप्रमाणे मागणी करत असल्याचे शालेय साहित्य विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

शैक्षणिक साहित्याचे दर- पेन 7 ते 15 रुपये, वॉटर बॅग 70 ते 400 रुपये, कंपास पेटी 50 ते 300 रुपये, टिफिन बॉक्स 50 ते 300 रुपये, स्कूल बॅग 200 रुपयांपासून पुढे वह्या 300 ते 600 रुपये डझन आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Election : नवाब मलिकांना न्यायालयाचा झटका: न्यायाधिशांनी केली प्रश्नांची सरबत्ती, वाचा न्यायालयातील घडामोडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.