ETV Bharat / city

हे सरकार अलीबाबा चाळीस चोरांची टोळी- सदाभाऊ खोत

author img

By

Published : Jun 28, 2021, 4:32 PM IST

खरीप हंगामात शेतकर्‍यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळावे यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बैलगाडी आणि नांगर घेऊन जिल्हा बॅंकेसमोर आंदोलन केले आहे.

आंदोलन
आंदोलन

नाशिक - खरीप हंगामात शेतकर्‍यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळावे यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बैलगाडी व नांगरासह जिल्हा बॅंकेसमोर आंदोलन केले आहे.

नाशकात जिल्हा बॅंकेसमोर सदाभाऊ खोत यांचे आंदोलन

'तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळावे'

जिल्हा बँक आणि राज्य सरकारच्या विरोधात भाजपा आणि रयत क्रांती संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली. सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज मिळावे, छोटे शेतकरी थकबाकीदारांचे शेती लिलाव त्वरित थांबावे ही प्रमुख मागणी आंदोलनात करण्यात आली.

'ज्या शेतकऱ्यांच्या बँकेत ठेवी आहेत त्या कर्जात वर्ग कराव्या'

जिल्हा मध्यवर्ती बँकेबाहेर रयत क्रांती संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असून त्यांना कर्जही मिळत नाही. त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली जात आहे. या सगळ्या बँकेच्या कारभाराविरोधात आज सोमवारी रयत क्रांती संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली द्वारका येथील मुख्य कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या बँकेत ठेवी आहेत, त्या कर्जात वर्ग कराव्या, शेतकऱ्यांना चक्रवाढ व्याज भरावे लागणार नाही, चक्रवाढ व्याज व सक्तीच्या वसुलीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्यादेखील केल्या असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.

बँकेच्या कारभाराचाही केला निषेध -

यावेळी रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज लवकर उपलब्ध करून द्यावे, २०१६ च्या नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ५०% व्याज सवलत दिली आहे. त्याची व्याप्ती वाढवावी व २०१६ ते २०२० पर्यंतच्या शेतकऱ्यांना व्याज सवलत मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, ७/१२ तारण ठेवलेल्या व कर्जफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव थांबवावे व त्या शेतकऱ्यांचे कर्ज फेडीसाठी ठराविक अंतराने हप्ते करून द्यावेत. यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नांगरणी आणि बैलजोडी देखील बँकेच्या आवारात आणून बँकेच्या कारभाराचा निषेध केला आहे. आंदोलनामध्ये प्रदेशाअध्यक्ष शिवनाथ जाधव, आमदार देवयानी फरांदे, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बंडू बच्छाव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक पगार, जिल्हाध्यक्ष, विशाल पवार, युराज देवरे आदिंसह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - Antilia Explosive Scare : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.