नाशिक - शहरातील नाट्यगृहे बंद आहेत. रंगकर्मी आणि नाटकावर अवलंबून असणारे अनेक घटक बेरोजगारीच आणि उपासमारीचा सामना करीत आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील नाट्यगृहे परत सुरू करा, मागील दीड वर्षापासून नाट्यसंस्थेच्या डिपॉझिट हे महानगरपालिकेने परत केलेले नाही, ते परत करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसे चित्रपट व नाट्य सेनेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे.
कालिदास कलामंदिरमध्ये कलाकारांची हेटाळणी केली जाते - मनसेचा अरोप
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील सगळे नाट्यगृह गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. मात्र नाट्यगृह सुरू असतांना आपले प्रयोग करण्यासाठी अनेक नाट्यसंस्थांकडून अनामत रक्कम देण्यात येते. मात्र दीड वर्ष उलटूनही हे डिपॉझिट परत न करण्यात आल्याने हे डिपॉझिट तातडीने परत करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ते परत करण्यास भाग पाडेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापालिकेला आहे. तर नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना देखील याबाबत निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये कलाकारांची हेटाळणी केली जात असल्याचा आरोपही यावेळी मनसेकडून करण्यात आला आहे.नाशिकमध्ये वेब सिरीज, मालिका यांचे चित्रिकरण होत आहे, ही चांगली बाब आहे. त्यात स्थानिक रंगकर्मींना काम आणि रोजगार द्यावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. त्याबाबत निर्मात्यांनी विचार करावा याबाबत बैठक झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
राजकीय कार्यक्रमाला परवानगी मग नाट्यगृहांना का नाही..?
सर्व काही सुरू असताना नाट्यगृह बंद का ? नाट्यगृहात राजकीय कार्यक्रम होतात त्यांना परवानगी मिळते परतु नाट्यप्रयोग होत नाहीत. नाट्यगृह सुरू होताच कोरोना वाढतो आणि राजकीय कार्यक्रम घेतल्याने वाढत नाही नाही का ? असा संतप्त प्रश्न नाट्य प्रेमींनी उपस्थित केला आहे. नाट्यगृह म्हणजे आमचा श्वास आहे, आमचा श्वास गुदमरतोय, आमचा श्वास आम्हाला परत द्या. प्रत्येक नाट्य कलाकार शासनाला विनंती करत आहे की नाट्यगृह सुरू करा. दीड वर्ष उलटले तरी अजूनही राज्य शासनाने नाट्यगृह सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने आता राज्य शासनाने नियम आणि अटी घालून नाट्यगृहे सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी नाशिकमधील नाटक कलाकारांकडून करण्यात येत आहे.
नाट्यगृह सुरू करण्याची मागणी योग्य - महापौर
गेल्या अनेक महिन्यापासून नाट्यगृहे बंद आहेत. नाट्यगृह सुरू करण्याची मागणी योग्य आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की,शासनाच्या गाईडलाईननुसार नाट्यगृह सुरू करता येणार नाही. राज्य शासनाने परवानगी दिली तर नाट्यगृह लवकर सुरू करू असे त्यांनी सांगितले आहे.
चित्रीकरणात स्थानिक रंगकर्मींना प्राधान्य द्यावे...
दरम्यान महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी कलाकारांसोबत योग्य त्या पद्धतीने व्यवहार करावे अन्यथा मनसे स्टाईलने त्यांना सौजन्यानं कसं वागावं हे शिकवले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. तर नाशिक मध्ये वेब सिरीज मालिका यांचा चित्रीकरण होत असल्याने त्यातही स्थानिक रंगकर्मींना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार मिळवून द्यावा अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असल्याची यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'ही' तर प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा, उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला सुनावले