नाशिक - नाशिकमधील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला ऐतिहासिक प्राचीन रामसेतू पाडण्यात येणार ( Ramsetu Bridge Demolished ) आहे. पंचवटी परिसरात हा पुल आहे. या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक आणि समाजसेवक एकवटले ( Nashik Citizens On Ramsetu Bridge ) आहेत.
हा पूल पंचवटी ते नाशिक गावाला जोडतो. 1930 पासून गावातून काळाराम मंदीरात जाण्यासाठी हा एकमेव पुल होता, असे सांगितलं जातं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रामसेतूची अवस्था बिकट झाली आहे. पुलावरील अनेक भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत नमामी गोदा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यामध्ये रामसेतूही पाडण्याचे प्रस्तावित आहे.
पण, हा पूल पाडण्याऐवजी त्याची दुरुस्ती करा, अशी मागणी स्थानिक करत आहेत. पूल पाडल्यावर तेथील दुकानदारांवर उपासमारीचीही वेळ येईल. त्यापार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांच्या वतीने रामसेतू बचाव अभियानही राबविण्यात येत आहे.
रामसेतू दुरुस्त करा मात्र पाडू नका
ऐतिहासिक रामसेतू पाडण्यास पंचवटीसह नाशिक शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध केला आहे. हा पूल ब्रिटिश काळात बांधण्यात आला असून, व्हिक्टोरिया पुलाप्रमाणेच हा पूल सुरक्षित आहे. त्यामुळे रामसेतू दुरुस्त करा, मात्र पाडू नका अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. निर्णय बदलण्यात आला नाही तर तीव्र प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन पूल पाडणार की त्याची डागडुजी करणार हे पाहणे महत्वाचे आहे
हेही वाचा - Telangana CM : 'सरकारने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावे', तेलंगणा सीएम KCR यांचा राहुल गांधींना पाठिंबा