ETV Bharat / city

'प्रोजेक्ट गोदा' : नदी पात्रातील काँक्रिटिकरण हटवणार

स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांमध्ये गोदावरी पात्रातील काँक्रेटिकरण काढण्यात येणार आहे. हे काँक्रिट हटवल्याने नदी पात्रातील 17 प्राचीन कुंड आणि नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित होणार आहेत.

author img

By

Published : Dec 11, 2019, 7:31 PM IST

project goda: concrete blocks will be removed soon
स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांमध्ये गोदावरी पात्रातील काँक्रेटिकरण काढण्यात येणार आहे.

नाशिक - स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांमध्ये गोदावरी पात्रातील काँक्रेटिकरण काढण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा गोदावरी मोकळा श्वास घेणार असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. हे काँक्रिट हटवल्याने नदी पात्रातील 17 प्राचीन कुंड आणि नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोदा प्रेमींच्या लढ्याला यश आले आहे.

सन 2003 मधील कुंभमेळ्यासाठी केलेल्या विकासकामांमध्ये गोदावरी नदीपात्रात काँक्रिटीकरण करण्यात आले. हे काम करताना प्रशासनाने नदीपात्रातील प्राचीन 17 कुंड सिमेंट-काँक्रिटने बुजवले होते. यामुळे नैसर्गिक जलस्रोत देखील लुप्त झाले.

नदी पात्रातील हे काँक्रिटीकरण हटवण्यासाठी गोदाप्रेमींकडून कायदेशीर लढा सुरू झाला. याआधी अनेकदा उच्च न्यायालयाने मनपा प्रशासनाला या मुद्द्यावरून फटकारले आहे.

शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आल्याने या प्रकल्पांतर्गत विकासकामांना सुरुवात झाली आहे. यामध्ये 'प्रोजेक्ट गोदा' हा महत्त्वाचा टप्पा आहे. संबंधित प्रकल्पात पात्रातील काँक्रिटीकरण काढण्याचे प्रस्तावित असल्याने गोदाप्रेमींसह नाशिककरांनी देखील याचे स्वागत केले. काँक्रिटीकरण काढण्यासंदर्भात अंतिम नकाशा तयार करण्यात आला असून यामध्ये 17 प्राचीन कुंड व नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित केले जाणार आहेत.

या कामाची सुरुवात येत्या शुक्रवारी होळकर पुलाजवळील गांधी तलावापासून करण्यात येणार असल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.

Intro:स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांमध्ये गोदावरी पात्रातील काँक्रेटिकरण येत्या दिवसात काढण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा गोदामाई मोकळा श्वास घेणार आहे.Body:गोदा पात्रात असणारे १७ प्राचीन कुंड आणि नैसर्गिक जलश्रोत काँक्रेटिकरण काढल्यामुळे पुनर्जीवित होणार आहेत त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोदा प्रेमींच्या लढ्याला यश आल्याने नाशिककरांकडून आनंद व्यक्त केला जातोय..Conclusion:सन 2003 मधील कुंभमेळा दरम्यान केल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये गोदावरी नदीपात्रात काँक्रिटीकरण करण्यात आले. हे काम करतेवेळी प्रशासनाने कोणताही विचार न करता नदीपात्रातील प्राचीन 17 कुंडे सिमेंट काँक्रिटच्या भरगच्च थराने बुजविले. यात नैसर्गिक जलस्रोतदेखील लुप्त झाले. यामुळे गोदा पात्रातील करण्यात आलेले काँक्रिटीकरण काढण्यासाठी गोदाप्रेमींकडून कायदेशीर लढा सुरू झाला. अनेकदा उच्च न्यायालयाने मनपा प्रशासनास या मुद्द्यावरून फटकारले असून, काही विधायक सूचनादेखील केल्या. नाशिक शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आल्याने, शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे करण्यात येत आहेत. यात महत्त्वाचा टप्पा मानला गेला तो म्हणजे 'प्रोजेक्ट गोदा' होय आणि यात गोदापात्रात करण्यात आलेले काँक्रिटीकरण काढण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने गोदाप्रेमींसह नाशिककरांनी याचे स्वागत केले. काँक्रिटीकरण काढण्यासंदर्भात अंतिम नकाशा तयार करण्यात आला असून, 17 प्राचीन कुंडे व नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित केले जाणार आहेत. या कामाची सुरुवात शुक्रवारी होळकर पुलाजवळील गांधी तलावापासून करण्यात येणार असल्याचे यावेळी देवांग जानी यांनी सांगितले....

बाईट : - देवांग जानी (गोदा प्रेमी )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.