ETV Bharat / city

Loudspeaker Row : पोलिसांनी नाकारली 39 मशिदींना अजानसाठी परवानगी, एकाही अर्जाला दिली नाही मंजुरी - राज ठाकरे शिवसेना वाद

पुणे, मुंबईत भोंग्यांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु आहे. नाशिकमध्ये यासंदर्भात आजपर्यंत मशिदी, मंदिराकडून परवानगीसाठी 60 अर्ज आले आहेत. त्यात 39 अर्ज पहाटे 5 वाजेपासून अजानची परवानगी मागितल्याने बाद करण्यात आलेत.

Police Rejected Permission To Mosque
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 4, 2022, 1:43 PM IST

नाशिक - राज्यात बहुतांशी धार्मिकस्थळांना भोंगे वाजवण्याची परवानगी नसल्याने पुणे, मुंबईत भोंग्यांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु आहे. नाशिकमध्ये यासंदर्भात आजपर्यंत मशिदी, मंदिराकडून परवानगीसाठी 60 अर्ज आले आहेत. या अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात 39 अर्ज पहाटे 5 वाजेपासून अजानची परवानगी मागितल्याचे आहेत. मात्र पोलिसांनी हे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पोलिसांकडून अद्याप भोंगा वाजवण्यासाठी एकही परवानगी देण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या परवानगीसाठी 60 अर्ज दाखल - यासंदर्भात पोलीसांना आजपर्यंत मशीद, मंदिराकडून भोंगा परवानगीसाठी 60 अर्ज आले आहेत. या अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात 39 अर्ज पहाटे 5 वाजेपासून अजानची परवानगी मागितल्याने बाद करण्यात आलेत. तर काहींचे बांधकाम महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याने या त्रुटींची पुर्तता करण्यास सांगण्यात आले आहे.

शंभराहून अधिक कार्यकर्त्यांना नोटीस - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवर असलेले अनाधिकृत भोंगे उतविण्याबाबत दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे. नाशिक शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणारी नाही, याची पोलीस यंत्रणेकडून पुरेपुर काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीने शहर व जिल्ह्यात पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी मनसेच्या 14 जणांना तडीपारच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शहरात आज सकाळी मशिदींसमोर लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणणाऱ्या 29 पदाधिकरी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात सहा महिला कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस देखील बजावण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.