ETV Bharat / city

Prohibition of Plantation Case : वृक्षारोपण मनाई प्रकरण; विद्यार्थिनीने बनाव केल्याचा चौकशी अहवालात आरोप, अहवाल चुकीचा असल्याचा विद्यार्थिनीचा दावा - Prohibition of Menstruation Plantation Case

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ( Devgaon Ashram School ) आश्रमशाळेत ( Devgaon Ashram School ) 25 जुलै रोजी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मासिक पाळी असल्यामुळे शिक्षकाने वृक्षारोपणात सहभाग घेऊ दिला नसल्याचा आरोप केला होता. यानंतर आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे ( Tribal Commissioner Hiralal Sonwane ) यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना ( Nashik project officer Varsha Meena ) आणि बालहक्क संरक्षण आयोग सायली पालखेडकर ( Protection Commission Saili Palkhedkar ) या द्विसदस्यीय समितीने चौकशी करून चौकशी अहवाल सादर केला.

Kanya Ashram School Student
कन्या आश्रम शाळा विद्यार्थिनी
author img

By

Published : Aug 2, 2022, 12:03 PM IST

Updated : Aug 2, 2022, 1:14 PM IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ( Devgaon in Trimbakeshwar ) येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत ( Devgaon Ashram School ) शिक्षकाने मासिक पाळी असल्याने एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मजाव केल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर आदिवासी आयुक्त यांनी चौकशी समिती नेमून, घटनेची माहिती घेतली. वृक्षारोपणाच्या दिवशी विद्यार्थिनी शाळेत हजर नव्हती. दोन महिन्यांपासून शाळेत सतत गैरहजर राहिल्याने कारवाईच्या भीतीतून विद्यार्थिनीने आरोप करताना अशा प्रकारचा बनाव केला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कन्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनी

काय होते प्रकरण : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेत 25 जुलै रोजी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मासिक पाळी असल्यामुळे शिक्षकाने वृक्षारोपणात सहभाग घेऊ दिला नसल्याचा आरोप केला होता. 'ज्या मुलींना मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करू नका. त्यांनी लावलेले झाड जगणार नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावल्यास ते जळून जाते, असा अजब फतवा शिक्षकाने काढून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याची तक्रार या विद्यार्थिनीने थेट आदिवासी आयुक्तांकडे केली होती.

अशी झाली चौकशी : शिक्षकाकडून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे ( Tribal Commissioner Hiralal Sonwane ) यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आणि बालहक्क संरक्षण आयोग सायली पालखेडकर ( Protection Commission Saili Palkhedkar ) या द्विसदस्यीय समितीने चौकशी करून चौकशी अहवाल सादर केला. या अहवालातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शाळेचे हजेरी पुस्तक तपासले असता शाळेत 14 जुलै रोजी वृक्षारोपण झाले त्या दिवशी तक्रार करणारी विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती. विशेष म्हणजे ही विद्यार्थिनी ही जून आणि जुलै महिन्यात केवळ सात दिवस शाळेत हजर असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

शिक्षकाला वाचवण्याचा प्रयत्न : मी आयुक्तांकडे जी तक्रार केली ती खरी आहे. मी वृक्षारोपणच्या दिवशी शाळेत होते. मला शाळेत जाण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे उशीर झाला. त्यामुळे सरांनी माझी गैरहजेरी लावली. हा चौकशी अहवाल म्हणजे शिक्षकाला वाचवण्याचा प्रयत्न आहे, मला तक्रार करायची असती तर इतरही अनेकही कारणे माझ्याकडे होती. मात्र, मी तसे केले नाही. शिक्षकावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : संजय राऊत यांची पुढील चौकशी ईडी करणार; राऊतांचे वकील त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात येणार

Last Updated : Aug 2, 2022, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.