ETV Bharat / city

Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्सप्रेसचे अकरा डबे रुळावरुन घसरले; 6 जखमी

author img

By

Published : Apr 3, 2022, 4:29 PM IST

Updated : Apr 4, 2022, 9:57 AM IST

नाशिक मधील पवन एक्स्प्रेसचे अकरा डबे रुळावरुन घसरले ( Nashik Pawan Express Derailed ) आहेत. इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या देवळाली ते लहवीत दरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान पुन्हा हे डबे रुळावर आणल्याची माहिती रेल्वेकडून ४ तारखेला सकाळी देण्यात आली.

Express Derailed nashik
Express Derailed nashik

नाशिक - मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेली दरभंगा पवन एक्सप्रेसचे 11 डब्बे रेल्वे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना घडली ( Nashik Pawan Express Derailed ) आहे. ही घटना दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी इगतपुरी स्थानकाच्या देवळाली ते लहवी दरम्यान घडली आहेत. या दुर्घटनेत एकाही मृत्यूची नोंद करण्यात आली नाही, तर 6 जण जखमी झाले आहेत. सापडलेला एक मृतदेह हा रेल्वेरुळाजवळ पूर्वीपासून पडलेला असू शकतो, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

शिवाजी सुतार प्रतिक्रिया देताना

अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल - शिवाजी सुतार यांनी सांगितले की, ट्रेन क्रमांक 11061 एलटीटी - जयनगर एक्सप्रेसचे काही डबे नाशिक जवळील देवळाली ते लहवीत स्थानकादरम्यान रेल्वे रूळाखाली घसरलेले आहे. ही घटना आज दुपारी तीन वाजून दहा मिनिटाच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अभियांत्रिकी पथक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याशिवाय या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांसाठी वैद्यकीय पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या मदतीसाठी मदत क्रमांक रेल्वेकडून जारी केला आहे.

  • Few coaches of 11061 LTT-Jaynagar Express have been derailed between Lahavit and Devlali (near Nashik) on Dn line at around 15.10 hrs today, April 3. Accident relief train and medical van rushed to the spot. Details awaited: Central railway CPRO

    — ANI (@ANI) April 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रेल्वे रुळाला तडे - पवन एक्सप्रेसच्या या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. रुळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय आहे, याबाबत रेल्वे कडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

नाशिकहून जयनगरसाठी विशेष ट्रेनचे नियोजन - इगतपुरी आणि देवलाली दरम्यान ट्रेन क्रमांक 11061 (LTT - जयनगर पवन एक्स्प्रेस) रुळावरून घसरली आहे. यातील सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह नाशिकरोड स्थानकावर आणण्यात येत आहे. नाशिकहून जयनगरसाठी विशेष ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे, सर्व इच्छुक प्रवासी या विशेष ट्रेनने त्यांच्या मार्गस्थानी जाऊ शकतात, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले.

अपघातातील जखमींची नावे -

1. पुष्पा मेहतो (वय 45)

2. मुकेश मेहतो (वय 46)

3. सरोज मिश्रा (वय 51)

6. लखीमचंद (वय 52)

दरम्यान, अपघातातील मृताची ओळख अद्याप पटलेले नाही.

रेल्वे विभागाकडून मदतीसाठी जाहीर केले संपर्क क्रमांक -

सीएसएमटी- 022-22694040

सीएसएमटी- 022-67455993

नाशिकरोड - 0253-2465816

भुसावळ - 02582-220167

आपत्ती व्यवस्थापन कक्ष- 54173

या गाड्या वळवल्या -

या रेल्वे गाड्या रद्द -

  • आज दोपहर लगभग 3:10 बजे डाउन लाइन पर लाहवित और देवळाली (नासिक के पास) के बीच 11061 एलटीटी-जयनगर एक्सप्रेस के कुछ डिब्बे पटरी से उतर गए हैं।

    रेलवे हेल्पलाइन नंबर 022 67455993
    एमटीएनएल 022 2694040
    नासिक हेल्पलाइन 0253 2465816

    — Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) April 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रेल्वेने जारी केलेले संपर्क क्रमांक -

हेही वाचा - 'राज ठाकरे हे तर पुष्पातले फुसके फ्लॉवर'; शरद पवारांवरील टीकेला रुपाली पाटलांकडून प्रत्युत्तर

Last Updated : Apr 4, 2022, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.