नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत 37 हजार 753 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 43 हजार 801 बाधित रुग्णांपैकी 2 लाख 3 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर कोरोनामुळे 2 हजार 781 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ करावी लागत आहे.
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ
नागरिकांच्या बेफिकिरीपणामुळे मार्च महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. 14 एप्रिल रोजी आतापर्यंत सर्वाधिक 6829 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. तसेच शहरातील सरकारी, खाजगी हॉस्पिटल तसेच कोरोना सेंटर भरले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे.
शहरात 1297 प्रतिबंधीत क्षेत्र
नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंत 1 लाख 49 हजार 141 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 लाख 26 हजार 409 जण कोरोना मुक्त झाले असून, सद्यस्थितीत 21 हजार 437 जण उपचार घेत आहेत. तसेच नाशिक शहरामध्ये बाराशे 1297 प्रतिबंधित क्षेत्र सद्यस्थितीत आहेत.
बेड ची परिस्थिती
नाशिक शहरातील सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर अशा 135 ठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. यात एकूण 5 हजार 187 बेडची सुविधा करण्यात आली आहे. यात 2151ऑक्सिजन बेड व 570 व्हेंटिलेटर बेड आहेत, तर 728 आयसीयू बेडची सुविधा करण्यात आली आहे. आरोग्य विभागामार्फत सर्व सुविधा सुरळीत सुरू असल्याचे म्हटले जात असले तरी कुठल्याचं हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही, अशी परिस्थिती असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची परवड सुरू आहे.
हेही वाचा - अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीमुळे महाविकास आघाडी होणार आक्रमक!