नाशिक - मनमाड मालेगाव महामार्गावर ( Oxygen cylinder explosion on Malegaon highway ) ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट ( Explosive oxygen cylinder ) झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. मालेगाव मनमाड माहामार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविली. मनमाड मालेगाव अग्निशमन दलाचा आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सिलिंडर गाडीने अचानक घेतला पेट - मनमाड-मालेगाव महामार्गावर कानडगाव शिवारात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात होऊन सिलिंडर गाडीने अचानक पेट घेतला. यात ऑक्सिजन सिलिंडर असल्याने स्फोट झाला. मनमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेलली. पोलिसांनी रस्ता ब्लॉक करून अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
माहामार्गावरील वाहतूक इतरत्र वळवली - मनमाड- मालेगाव माहामार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 150-200 सिलेंडर असल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असले तरीही भीषण सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडथळे येत आहेत. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला मनमाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.