ETV Bharat / city

'महा' विधानसभा : 'उत्तर महाराष्ट्र' युतीच्या जागा टिकणार की वाढणार? काँग्रेस राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई - उत्तर महाराष्ट्राचे राजकीय राजकीय चित्र

उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या 47 जागा आहेत. गुरूवारी विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या पाचही जिल्ह्यांच्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला आढावा...

उत्तर महाराष्ट्राचा राजकीय आढावा
author img

By

Published : Oct 23, 2019, 10:27 AM IST

मुंबई - एकमेकंना अडचणीत आणण्यासाठी शिवसेना-भाजपकडून खेळल्या गेलेल्या खेळीमुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला तडा गेला. सात जागांवर शिवसेनेविरोधात भाजप, तर दोन ठिकाणी भाजपसमोर शिवसेना बंडखोरांचे आव्हान आहे. बंडखोरीमुळे रंगतदार बनलेल्या लढतींमध्ये युतीतील दोघांपैकी कोण सरस ठरणार, की हे मतभेद काँग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

2014 ची आकडेवारी

  • भाजप - 19
  • शिवसेना - 8
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 10
  • काँग्रेस - 9
  • इतर - 1

2014 ची परिस्थिती

2014 ची निवडणूक राज्यात सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उमेदवार दिले होते. तसेच मनसे आणि एमआयएमनेही आपले उमेदवार काही ठिकाणी देत, निवडणूकीत रंगत आणली होती. 2014 साली केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूकावरही भाजपचा प्रभाव राहिला. राज्यातील इतर विभागांप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात भाजप 18 जागा मिळवत नंबर एकचा पक्ष राहिला. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या होत्या. या ठिकाणी युती नसण्याचा तोटा शिवसेनेला त्यावेळेस झाल्याने शिवसेनेच्या फक्त 8 जागा निवडून आल्या होत्या.

2019 ची परिस्थिती

उत्तर महाराष्ट्रात यावर्षी साधारण 60 टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनतंर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप, सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या 47 जागा आहेत. भाजप १९, शिवसेना १५, राष्ट्रवादी २१, काँग्रेस १३, वंचित बहुजन आघाडी २५, मनसे १३, एमआयएम तीन जागा लढवत आहे गेल्या वेळी सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने प्रतिस्पर्धी होते. प्रचारात उघड हल्ले करता आले. यावेळी मात्र वेगळी स्थिती आहे. सेना-भाजपला खुल्या संघर्षांस मर्यादा आल्या. शक्य तिथे प्रतिशहाचे डावपेच आखले गेले. एकमेकांना चक्रव्यूहात अडकविण्याची एकही संधी कोणी सोडली नाही. लोकसभा निकालाने शक्तीहीन झालेले विरोधक विधानसभेसाठी पुन्हा एकत्रितपणे मैदानात उतरले असताना सेना-भाजपची शक्ती परस्परांना नामोहरम करण्यात अधिक खर्ची पडल्याचे दिसून आले.

लक्षवेधी लढत

  1. नंदुरबार - विजयकुमार गावित (भाजप) vs उदेसिंह पाडवी (काँग्रेस)
  2. धुळे शहर - हिलाल माळी (शिवसेना) vs अनिल गोटे
  3. सिंदखेडा - जयकुमार रावल (भाजप)* vs संदीप बेडसे (राष्ट्रवादी)
  4. रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप) vs शिरीष चौधरी (काँग्रेस)
  5. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील (शिवसेना)* vs पुष्पा ज्ञानेश्वर महाजन (राष्ट्रवादी)
  6. जामनेर - गिरीष महाजन (भाजप)* vs संजय गरुड (राष्ट्रवादी)
  7. मुक्ताईनगर - रोहिणी खडसे (भाजप) vs चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादीचा पाठिंबा)
  8. सिल्लोड - अब्दुल सत्तार (शिवसेना)* vs खैसर आझाद (काँग्रेस)
  9. कन्नड - उदयसिंग राजपूत (शिवसेना) vs संतोष कोल्हे (राष्ट्रवादी) vs हर्षवर्धन जाधव (अपक्ष)
  10. फुलंब्री -हरिभाऊ बागडे (भाजप)* vs कल्याण काळे (काँग्रेस)
  11. नांदगाव - सुहास कांदे (शिवसेना) vs पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
  12. येवला -छगन भुजबळ (राष्ट्रवादी) vs संभाजी पवार (शिवसेना)
  13. इगतपुरी - निर्मला गावित (शिवसेना) vs हिरमान होस्कार (काँग्रेस)
  14. अकोले -वैभव पिचड (भाजप) vs किरण लहामटे (राष्ट्रवादी)
  15. संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस) vs साहेबराव नवले (शिवसेना)
  16. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) vs सुरेश थोरात (काँग्रेस)
  17. अहमदनगर शहर -संग्राम जगताप (राष्ट्रवादी) vs अनिलभैय्या राठोड (शिवसेना) vs श्रीपाद छिंदम (बसप)
  18. कर्जत जामखेड - राम शिंदे (भाजप) vs रोहित पवार (राष्ट्रवादी)

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.