ETV Bharat / city

नाशिकमध्ये दरोडेखोर व गावकऱ्यांमध्ये झटापट.. जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, ४ जण गंभीर

मोरे यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे ग्रामस्थ आले. यावेळी हाणामारी होऊन एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य ४ फरार झाले.

दरोडेखोर आणि गावकऱ्यांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू
author img

By

Published : May 5, 2019, 8:41 AM IST

Updated : May 5, 2019, 9:36 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील चांदवड शहरालगत असलेल्या खैसवाडा वस्तीवर अज्ञात ५ ते ६ लोकांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून मोरे यांना गंभीर जखमी केले. मोरे यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. गावकरी आणि चोरांत झालेल्या तुफान हाणामारीत एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार

नामदेव मोरे खैसवाडा वस्तीवर आपल्या कुटुंबीयांसह बाहेर झोपलेले होते. एका टोळक्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी मोरे यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे ग्रामस्थ आले. यात झटापट होऊन एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य ४ फरार झाले. चौघांपैकी आणखी एका चोराला पकडण्यात यश आले असून त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.

घटनास्थळी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक निलोतपल, उपविभागीय पोलीस अधिकारी रागसुधा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत चांडवड परिसरात चोर पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली. या घटनेमुळे चांदवड परिसरात खळबळ उडाली असून नेमका हा प्रकार काय आहे? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरात जगत असलेल्या खैसवाडा वस्तीवर अज्ञात पाच ते सहा लोकांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून मोरे यांना गंभीर जखमी केले मोरे यांच्या आरडाओरडा ऐकून शेजारी धावले चोरटे व गावकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी होऊन यात एका चोराचा जागीच मृत्यू तर चार लोक गंभीर जखमी झाले

Body:नामदेव मोरे हे आपल्या खैसवाडा वस्तीवर आपल्या कुटुंबीयांसह बाहेर झोपलेले असताना एका टोळक्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला यावेळी मोरे यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने शेजारी ग्रामस्थ आले यात झटापट होऊन एका चोराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार फरार झाले या चार पैकी आणखी एक चोराला पकडण्यात यश आले असून त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाढवण्यात करण्यात आलेले आहे..

Conclusion:घटनास्थळी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक निलोतपल , उपविभागीय पोलिस अधिकारी रागसुधा यांनी घटनास्थळीची पहानी केली तसेच रात्री उशिरापर्यंत चांडवड परिसरात चोर पकडण्यासाठी नाका बदी केलीय..
या घटनेमुळे चांदवड परिसरात खळबळ उडाली असून नेमका हा प्रकार काय आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे
Last Updated : May 5, 2019, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.