ETV Bharat / city

महिला सुरक्षिततेसाठी 8 मार्चला नाशिक पोलिसांची 'निर्भया मॅरेथॉन'

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हिच भावना बाजूला सारून महिलांनी सक्षम बनावे, यासाठी यंदा होणाऱ्या नाशिक पोलीस मॅरेथॉनला 'निर्भया मॅरेथॉन' असे नाव देण्यात आले आहे.

cp vishwas nangare patil
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील
author img

By

Published : Feb 26, 2020, 8:34 PM IST

नाशिक - 'एक धाव स्वतःसाठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी' या ब्रीद वाक्यखाली नाशिक पोलिसांनीं आठ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 'निर्भया मॅरेथॉन'चे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये मराठी, हिंदी चित्रपटातील कलाकारांसह हजारो नाशिककर धावणार आहेत.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हिच भावना बाजूला सारून महिलांनी सक्षम बनावे, यासाठी यंदा होणाऱ्या नाशिक पोलीस मॅरेथॉनला 'निर्भया मॅरेथॉन' असे नाव देण्यात आले आहे. यासाठी पोलिसांची जय्यत तयारी सुरू असून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध संघटना, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना एकत्रित करून त्यांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी करून घेणार आहेत.

या मॅरेथॉनसाठी खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरु, जानवी कपूर, सैयमी खैर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे उपस्थित राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले. ही निर्भया मॅरेथॉन 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर या भागात होणार आहे. ही मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना मेडल देण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सुरक्षेसाठी प्रत्येकाने या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावेत, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.