नाशिक : वाईन कॅपिटल सिटी ( Wine Capital City Nashik ) म्हणून नाशिकची ओळख आहे. अशात नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची पावलं नाशिकच्या वाइन यार्डकडे वळत ( Nashik Wine Yard ) आहेत. त्यामुळे नाशिकचे सर्वच वाइन यार्ड पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. तसेच नाशिकमध्ये वाईनरीची ( Wineries In Nashik ) संख्या देखील अधिक आहे. नाशिकच्या वाईनला देशात नव्हे तर परदेशात देखील मागणी असते. दरवर्षी लाखो लिटर वाईन नाशिकच्या वाईनरीमधून बाहेर पडत असते. मात्र, मागील दोन वर्षांत कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिकच्या वाईनरीला मोठा आर्थिक फटका बसलाय. मात्र, आता कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने पर्यटक मोठ्या संख्येने वाईनयार्डला भेट देत वाइनचा आस्वाद घेत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि मोठ्या संख्येत लसीकरण झाल्याने नववर्षानिमित्त नाशिकच्या वाईन यार्डमध्ये पर्यटकांची संख्या वाढतेय.
थंड वातावरण आणि त्यात वाईनचा आस्वाद
मी दोन वर्षानंतर दुबईहून आली आहे. आज माझ्या फॅमिलीसोबत या वाइन यार्डला आलो आहे. या ठिकाणचे निसर्गरम्य वातावरण खूप छान आहे. सध्या नाशिकला 14 ते 15 अंश तापमान आहे. थंडगार वारा आणि त्यात वाइनचा आस्वाद यामुळे खूप छान वाटतं. आम्ही आजच नववर्षचे सेलिब्रेशन करतं आहे, असं एका महिला पर्यटकाने सांगितलं.
वाईनची मागणी वाढली
मागील दोन वर्षपासून कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका हॉटेल व्यावसायिक आणि वाईनरील बसला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने वाईन यार्डला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. अशात ओमायक्रॉनचा धोका ( Omicron Threat In Nashik ) लक्षात घेता पर्यटक देखील योग्य ती काळजी घेऊन, मास्क वापरून वाईन यार्डला भेट देत आहेत. नववर्षाच्या निमित्ताने मागील दोन वर्षापेक्षा यंदा वाईनची मागणी वाढली आहे. यावर्षी वाईनच्या रेड वाइन, स्पिनकलर वाईनला देशासह इतर देशाततून मोठी मागणी आहे. यंदाचे नववर्ष काही प्रमाणात नुकसान भरून काढेल, अशी आम्हला आशा असल्याचे सुलावाईनचे मॅनेजर मोनित ढवळे यांनी सांगितलं आहे.