ETV Bharat / city

नाशिक शहर होणार भिकारीमुक्त ; पोलीस आयुक्तांकडून भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण सुरू - survey

शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेत भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण करत त्यांचे पूनर्वसन करण्याचे ठरवले आहे.

नाशिक पोलिसांकडून शहरातील भिकाऱ्यांचे सर्वेक्षण
author img

By

Published : May 16, 2019, 7:33 PM IST

नाशिक - धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यासोबतच शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, शहराला मोठया प्रमाणात भिकाऱ्यांचा विळखा पडला आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेत भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण करत त्यांचे पूनर्वसन करण्याचे ठरवले आहे.

नाशिक पोलिसांकडून शहरातील भिकाऱ्यांचे सर्वेक्षण

भिकारी मुक्त शहर व्हावे यासाठी यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शहर पोलीसांच्यावतीने एकूण ४ पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत. परिमंडळ १ आणि २ यांचा यात समावेश आहे. या सर्वेक्षणात महिला आणि बालकांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शहराच्या सर्वच रस्त्यावरील भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण करून याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. पुढील ८ ते १० दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे.

नाशिक शहर पोलीस, सामाजिक संस्थांनी आणि शासनाच्या इतर विभागाचे यात सहकार्य लाभणार आहे. यासंबंधित आपली खरी माहिती पोलिसांना देणे बंधनकारक राहणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय भिकाऱ्यांचे पालनपोषण आणि पुढील कारवाईसाठी विशेष उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हेल्मेटसक्तीनंतर पोलिसांच्या या नवीन उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक आणि भाविक येतात. मात्र, ह्या भाविकांना आणि पर्यटकांना भिकाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. यासाठी देशभरातुन कोटीच्या संख्येने भाविक येतात. यावेळी काहीजण आपल्यासोबत आलेल्या वृद्ध व्यक्तींना इथेच सोडून देण्याच्या घटना घडतात. असे काही वृद्ध जेवण मिळेल म्हणून पंचवटी परिसरात भीक मागताना दिसून येतात. पंचवटी परिसरात भीक मागणारे शेकडो भिकारी आहेत.

नाशिकच्या प्रत्येक सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भमधून आलेल्या कुटुंबाची संख्या अधिक आहे. यातील काहीजण सिग्नलवर गजरे तसेच किरकोळ साहित्य विक्री करतात. मात्र, त्यातीलच काही लहान मुले आणि महिला भीक मागताना दिसून येतात. राहण्यासाठी अनेकांनी वाहतूक बेट, उड्डाणपुलाच्या खाली तसेच मोकळ्या जागेत आपले बस्तान बसवले आहे.

Intro:नाशिक होणार भिकारी मुक्त शहर..पोलीस आयुक्तानं कडून रस्त्यावरील भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण सुरू...

Body:धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून नाशिकची ओळख आहे,त्यासोबतच स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत आहे..मात्र ह्या शहराला मोठया प्रमाणात भिकाऱ्यांचा विळखा पडला आहे.आणि ही संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे,ह्या साठी आता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पुढाकर घेतला असून भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण करण्यात येत असून लवकरच त्याचं पुनर्वसन साठी प्रयत्न केले जाणार आहे...

नाशिक मध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक आणि भाविक येत असतात,मात्र ह्या भाविकांना आणि पर्यटकांना भिकाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते, नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा भरतो,ह्या दरम्यान देशभरातुन करोडो भाविक येत असतात.अशात काही जण आपल्या आपल्या सोबत आलेल्या वृद्ध व्यक्तींना इथेच सोडून देण्याच्या घटना देखील घडल्या आहेत...काही जण दोन वेळेचे जेवण मिळेल म्हणून पंचवटी परिसर भीक मागताना दिसून येतात...एकट्या पंचवटी परिसर शेकडो भिकारी आहेत...
नाशिक च्या प्रत्येक सिग्नल वर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे...ह्यात मराठवाडा,विदर्भ मधून आलेल्या कुटुंबाची संख्या अधिक आहे..ह्या तील काही जण सिग्नल वर गजरे तसेच किरकोळ साहित्य विक्री करता मात्र त्यातीलच काही लहान मुलं तसेच महिलां भीक मागताना दिसून येतात..राहण्या साठी ह्यातील अनेकांनी वाहतूक बेट,उड्डाण पुलाच्या खाली तसेच मोकळ्या जागेत आपलं बस्तान बसवलं आहे .अनेक वेळा महानगरपालिका आणि पोलिसांन कडून त्यांना ह्या ठिकाणाहून बाहेर काढत समज दिली जाते..मात्र काही दिवसानंतर पुन्हा हे भिकारी तिथं राहत असल्याचं चित्र बघायला मिळत..

अपघातात मृत्यू टाळावा या उद्देशाने हेल्मेट धारक शहर करण्यासाठी आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता भिकारी मुक्त शहर व्हावे यासाठी यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे,शहर पोलीस यांच्या वतीने एकूण चार पथके यासाठी तयार करण्यात आली आहे, परिमंडळ एक आणि दोन यांचा यात समावेश आहे ,शहराच्या सर्वच रस्त्यावरील भिकाऱ्यांचे लेखी सर्वेक्षण करून ही माहिती पोलिस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात येणार आहे, या सर्वेक्षणात महिला आणि बालकांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे..
पुढील आठ ते दहा दिवस हे सर्वेक्षण पूर्ण केलं जाणार आहे, नाशिक शहर पोलीस,सामाजिक संस्थांनी आणि शासनाच्या इतर विभागाचे यात सहकार्य लाभणार आहे,यासंबंधीताला आपली खरी माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे...हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय या भिकाऱ्यांचे पालन पोषण आणि पुढील कारवाईसाठी विशेष उपाययोजना करणार असल्याचे ही कळते..या सर्व गोष्टी लक्षात घेता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सामाजिक संस्थेमार्फत भिकाऱ्यांना भिकाऱ्यांचे पुनर्वसन करावे या हेतूने लेखी सर्वेक्षण सुरू केले आहेत यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या भागातील मित्रांच्या संख्येबाबत आणि त्यांची माहिती लेखी स्वरुपात मागवण्यात आली आहे नाशिक मध्ये एकीकडे हेल्मेट सक्ती बाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून दुसरीकडे शहर दुसरीकडे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या नाशिक मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्रास होणार नाही याची खबरदारी देखील आता पोलिस आयुक्तांकडून घेण्यात येत आहे त्यांनी सुरू केलेला हा हे सर्वेक्षण आणि त्यानंतरच भिकाऱ्यांचे पुनर्वसन याबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जाते

टीप फीड FTP
nsk bhikari sarvection viu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.