ETV Bharat / city

नाशिक पोलिसांनी अवघ्या २० दिवसात शेतकऱ्यांचे ५ कोटी दिले मिळवून, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे दणाणले धाबे - नाशिक शेतकऱ्यांची फसवणूक करणारे व्यापारी बातमी

प्रताप दिघावकर यांनी न्याय मिळवून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी दिघावकर यांच्या कामाचे कौतुक करत आभार मानले. विशेष म्हणजे ज्या शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून फसवणूक झाली होती. त्यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या फसवणुकीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना दिवाकरांच्या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

nashik police return rs 5 crore to farmers in just 20 days from fraudulent traders
नाशिक पोलिसांनी अवघ्या २० दिवसात शेतकऱ्यांचे ५ कोटी दिले मिळवून
author img

By

Published : Oct 7, 2020, 4:46 PM IST

नाशिक - व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना अवघ्या वीस दिवसात तब्बल पाच कोटी रुपये परत मिळवून देण्याची कामगिरी नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केली. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

नाशिक पोलिसांनी अवघ्या २० दिवसात शेतकऱ्यांचे ५ कोटी दिले मिळवून

पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर झटत आहेत. त्यांनी अवघ्या वीस दिवसात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पाच कोटी रुपये व्यापाऱ्यांकडून परत मिळवून दिले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत या कामगिरिबाबत माहिती दिली. या वेळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे देखील उपस्थित होते.

प्रताप दिघावकर यांनी न्याय मिळवून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी दिघावकर यांच्या कामाचे कौतुक करत आभार मानले. विशेष म्हणजे ज्या शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून फसवणूक झाली होती. त्यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या फसवणुकीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना दिवाकरांच्या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

द्राक्ष..कांदा..डाळिंब...या सारख्या पिकांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा शेतीमाल परदेशात निर्यात केला जातो. अनेक व्यापारी हा माल पोहोचलाच नाही.. खराब निघाला.. ही कारणे देत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे देत नसल्याच्या सर्वश्रुत आहे. पोलीस दप्तरीही या शेतकऱ्यांना आजवर न्याय मिळत नसल्याचे चित्र होते. मात्र, प्रताप दिघावकर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणे. त्यांच्या जंगम मालमत्ता जप्त करणे, अशा कारवाईचा धडाका लावल्याने वीस दिवसात तब्बल पाच कोटी रुपये शेतकऱ्यांना परत मिळाले आहे. या कारवाईत आजवर ९० व्यपाऱ्यावंर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर १०० हुन अधिक व्यापऱ्यांनी कारवाईच्या भीतने पैसे परत देण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून कौतुक केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.