नाशिक - शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रण ठेवण्यासाठी थेट पोलीस रस्त्यावर उतरले आहे. बुधवारी पोलीस आयुक्तांनी शहरातील मेन रोड येथील व्यापारी पेठेत पायी चालत परिसराची पाहणी केली आहे. मास्क न वापरण्यावर थेट होणार कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
शहरातील नागरिक महामारीसाठी त्रिसूत्रीवर भर देत असल्याच्या जाणवल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा-लस ही कवच-कुंडल.. मात्र लस घेतल्यानंतरही होऊ शकतो कोरोना - राजेश टोपे
मास्क न वापरण्यावर थेट होणार कारवाई , कोविड सेंटरमध्ये रवानगी
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले की, नाशिक शहरामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस सरळ कारवाई करणार आहेत. मास्कचा वापर न केल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. जर मास्कचा वापर कोणी करत नसेल तर, दंडाच्या कारवाईबरोबरच सरळ अशा व्यक्तींना पोलीस आपल्या गाडीत घालून कोरोना सेंटरवरती घेऊन जाणार आहेत. त्यांची रॅपिड एँटीजन टेस्ट केली जाईल. चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे. जर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांना सोडून दिले जाईल. अहवाल पॉझिटिव्ह आला तर, त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत. यासारखी थेट कारवाई आता केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त पांडेय यानी सांगितले आहे.
हेही वाचा- पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
त्रिसूत्रीचा वापर होत असल्याने आयुक्तांनी केले समाधान व्यक्त-
शहरांमध्ये सरकारने ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीचा शंभर टक्के वापर होत असल्याचे पाहून पोलीस आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांचे सहकार्य मिळाले तर प्रशासनही निर्बंधावर पुनर्विचार करू शकतात, याचे संकेतही त्यांनी दिले आहे.