ETV Bharat / city

Nashik Police Commissioner Tears : फुलवाल्या मावशीच्या अंत्ययात्रेत पोलीस आयुक्त गहिवरले

author img

By

Published : Jan 4, 2022, 12:32 PM IST

पोलीस आयुक्त दीपक पांडये रोज त्यांच्या घरासमोरील मावशीकडून फुल खरेदी करत होते. त्यामुळे त्यांचे चांगले ऋणानुबंध बनले होते. मात्र आजारपणामुळे जिजाबाई पुराणे यांची प्राणजोत मालवली. ही बातमी समजताच पोलीस आयुक्त दीपक पांडये त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मुलाचे सांत्वन केले, यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडये यांना अश्रू अनावर ( Nashik Police Commissioner deepak pandey Tears ) झाले होते.

Nashik Police Commissioner Tears
पोलीस आयुक्त दीपक पांडये

नाशिक - नाशिकच्या महात्मा नगर भागातील पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाजवळ जिजाबाई पुराणे या मावशी छोटासा फुलाचा व्यवसाय करत होत्या. आयुक्त दीपक पांडये रोज या मावशीकडून फुल खरेदी करत होते. त्यामुळे त्यांचे चांगले ऋणानुबंध बनले होते. मात्र आजारपणामुळे जिजाबाई पुराणे यांची प्राणजोत मालवली. ही बातमी समजताच पोलीस आयुक्त दीपक पांडये त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मुलाचे सांत्वन केले, यावेळी पांडये यांना अश्रू अनावर ( Nashik Police Commissioner deepak pandey Tears ) झाले होते.

फुलवाल्या मावशीच्या अंत्ययात्रेत पोलीस आयुक्त गहिवरले

खर्चाची काळजी न करण्याचे केले होते आवाहन -

गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ असलेले नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांची भावनिक बाजू आज नाशिककरांनी बघितली. नाशिकच्या महात्मा नगर भागातील पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाजवळ जिजाबाई पुराणे या मावशी छोटासा फुलाचा व्यवसाय करत होता. आयुक्त दीपक पांडये रोज या मावशी पूजाविधीसाठी फुल खरेदी करत होते, मागील महिन्याभरापूर्वी मावशी दिसल्या नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला विचारपूस केली. त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून त्यांनी मुलाने सांगितल्यावर पांडये यांनी थेट मावशीचे घर गाठून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अर्धा तास थांबून आर्थिक खर्चाचा काळजी करू नका असे म्हणत त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.

फुल विक्रेत्या महिलेच्या अंत्ययात्रेत पोलीस आयुक्तांची हजेरी -

दुर्दैवाने दोन दिवसांनंतर त्यांची प्राणजोत मालावली ही बातमी कळताच पांडये यांनी पुष्पचक्र घेत त्यांचे घर गाठले. यावेळी मुलाला मानसिक धीर देत अंतदर्शन घेत अंत्ययात्रेत सहभागी झाले. एका गरीब कुटुंबातील फुल विक्रेत्या महिलेच्या अंत्ययात्रेत पोलीस आयुक्तांनी हजेरी लावण्याची ही पाहिलीच वेळ असावी. पोलीस आयुक्तांना अंत्ययात्रेत बघून सातपूर परिसरातील नागरिकांना त्याच्यातील संवेदनशील व्यक्तीचा अनुभव आला.

हेही - Mother Son Fell from Train : भंडाऱ्यात धावत्या रेल्वेतून पडून आई आणि मुलाचा मृत्यू

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.