ETV Bharat / city

Nashik Police : दहशत माजविणाऱ्या सराईतांची गुंडांची नाशिक पोलिसांनी काढली धिंड - गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली

चैन स्नॅचींग, वाहन जाळपोळ, तोडफोड हाणामाऱ्या या सारख्या घटनांनी शहरातील गुन्हेगारी डोके वर काढत आहे. पोलिसांनी ( Nashik Police ) याविरोधात कारवाई करण्यासाठी कंबर कसली असून दोन दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरातील संगमेश्वर नगरमधील एका घरात घुसून तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची नाशिक पोलिसांनी धिंड काढली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 7, 2022, 7:42 PM IST

नाशिक - चैन स्नॅचींग, वाहन जाळपोळ, तोडफोड हाणामाऱ्या या सारख्या घटनांनी शहरातील गुन्हेगारी डोके वर काढत आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरातील संगमेश्वर नगरमधील एका घरात घुसून तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली.

बोलताना पोलीस अधिकारी व तक्रारदार महिला

चेहडीत दहशत माजवनाऱ्याची त्याच भागातून धिंड - चैन स्नॅचींग, वाहन जाळपोळ, तोडफोड हाणामाऱ्या या सारख्या घटनांनी शहरातील गुन्हेगारी डोके वर काढत आहे. घरात घुसून तोडफोड करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याची याच परिसरातून नाशिक रोड पोलिसांनी धिंड काढली ( Nashik Police ) आहे. 5 फेब्रुवारी नाशिकच्या चेहडी परिसरात पूर्व वैमनस्यातून सराईत गुन्हेगार संदीप शिंदे उर्फ हुसल्या, रोशन सोनवणे उर्फ शेंड्या आणि त्यांच्या साथीदारांनी भारती बायस या महिलेच्या घरात घुसून कोयता, लोखंडी रॉडने घराची तोडफोड करत दहशद मजविण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी यातील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांची या परिसरातून धिंड काढत त्यांना भर चौकात चोप दिला. हे दोन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत या आरोपींना ताब्यात घेत या परिसरातून ओळख परेड केली. यावेळी पोलिसांनी या आरोपींना चौका-चौकात नेऊन नागरिकांसमोर दंडुक्यांचा प्रसाद दिला. या पुढे कोणी असे कृत्य केले तर त्यांनाही, असाच चोप दिला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यांच्याविरोधात खून तसेच मारामाऱ्या, गावठी कट्टे बाळगणे याबाबतचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घडलेल्या प्रकाराची दखल मध्यवर्ती घेतल्यानंतर अखेर या संशयितांच्या विरोधात 452, 4/25 आर्म्स अॅक्टचा ( Arms Act ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक पोलिसांनी नाशिक शहर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या या सराईत गुन्हेगारांची धिंड काढत त्यांना भर चौकात चोप दिल्याने शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. भरदिवसा शहरात हाणामाऱ्या, वाहन जाळपोळ, तोडफोड अशा घटना घडू लागल्याने नाशिक पोलीस ( Nashik Police ) आता ॲक्शन मोडमध्ये ( Action Mode ) आले आहे. शहर पोलिसांच्या कारवाईचे नाशिककरांनीही स्वागत केला आहे.

हेही वाचा - Complaint File Against Police : गैरवर्तन करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्राच्या रणरागिणीचा हिसका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.