ETV Bharat / city

Helmet Compulsory In Nashik : दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट सक्ती; "अन्यथा 18 जानेवारीपासून..." - नाशिक पोलिस आयुक्त

नाशिक शहरात पुन्हा हेल्मेट सक्ती ( Helmet Compulsory In Nashik ) केली जाणार आहे. 18 जानेवारी जानेवारीपासून ही सक्ती केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी ( Nashik Police Commissioner ) दिली. नियमांचे पालन न केल्यास वाहन चालकांना दोन तास समुपदेशन, परीक्षा देणे अथवा दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

Helmet Compulsory In Nashik
नाशिक हेल्मेट सक्ती
author img

By

Published : Dec 26, 2021, 1:48 PM IST

नाशिक : नाशिक मध्ये पुन्हा हेल्मेट सक्ती ( Helmet Compulsory In Nashik ) करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी ( Nashik Police Commissioner ) दिली आहे. शहरातील वाहनधारकांकडून हेल्मेट सक्तीच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने येत्या 18 जानेवारीपासून ही सक्ती आणखी कडक केली जाणार आहे. याबाबात त्यांनी आदेश काढला असून, त्यात सांगितल्यानूसार यापुढे दुचाकीवरील दोघांना हेल्मेटसक्ती असणार आहे. अन्यथा संबंधितांना दोन तास समुपदेशन, परीक्षा देणे अथवा दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

हेल्मेटसक्ती नंतरही २९ जणांचा मृत्यू

15 ऑगस्टपासून नाशिक पोलिसांनी दुचाकी चालकाला हेल्मेट सक्ती लागू केली होती. मात्र, त्यानंतरही २९ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ५ हजार ४७५, तर एकट्या डिसेंबरमध्ये २ हजार ८७९ या प्रमाणे ८ हजार ३६४ जण विनाहेल्मेट चालकांवर कारवाई केली. प्रबोधनानंतरही हेल्मेट सक्तीचे पालन होत नसल्याने आता दंडात्मक कारवाईसह वाहन परवाना देखील रद्द केला जाणार आहे.

...तोपर्यंत वाहन पोलिसांच्याच ताब्यात

यासंदर्भात बोलताना सहाय्यक आयुक्त शहर वाहतूक सीताराम गायकवाड यांनी सांगितले की, "18 जानेवारी 2022 पासून विनाहेल्मेट दुचाकींदारांना समुपदेशनाची कार्यशाळा तर करावीच लागेल. पण, त्यासोबत ई-चलन अंतर्गत पाचशे रुपये दंड, तोच व्यक्ती दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळून आल्यास एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत विना हेल्मेट धारक दंड भरत नाही, तोपर्यंत त्याचे वाहन पोलिसांच्याच ताब्यात राहील व दंड भरल्यानंतरच त्याचे वाहन त्याला ताब्यात देण्यात येणार आहे. दुचाकी चालवितांना हेल्मेटचा स्वतःच्या सुरक्षेसाठी वापर करावा व समुपदेशनासाठी खर्च होणारा वेळ वाचावावा," असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.