नाशिक : एमबीए, इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या नाशिकच्या तेजल बांगर हिने ( Tejal Bangar Makeup Artist ) आपल्या मूळ कॉर्पोरेट क्षेत्रातून नोकरी बाजूला ठेऊन मेकअप क्षेत्रात प्राविण्य मिळविले. नुकत्याच झालेल्या न्यूयॉर्क फॅशन विकमध्ये तिने आपल्या कौशल्याची चमक दाखवली आहे.
न्यूयॉर्क फॅशन वीक : न्यूयॉर्क फॅशन वीक 2022 मध्ये नाशिकला राहणारी मेकअप आर्टिस्ट ( Makeup Artist ) , फ़्रीलान्स मेकअप आर्टिस्ट ( Freelance Makeup Artist ) आणि मेकअप एज्युकेटर ( Makeup Educator ) तेजल बांगर हिला न्यूयॉर्क फॅशन वीकसाठी न्यूयॉर्कमध्ये आमंत्रित करण्यात आले ( New York Fashion Week 2022 ) होते. ज्यामुळे मेकअप आणि केशरचनासाठी देशाचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव भारतीय बनली आहे.तेजल,हिने सिव्हिल इंजिनीअर-एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र आता तिने आपली वाट बदलत नाशिकमध्ये ब्युटी सलून चालवते आणि bridal आणि high- Fashion मेकअप तज्ञ आहे. NYFW हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त फॅशन इव्हेंट आहे जो वर्षातून एकदा न्यूयॉर्क सिटी, यूएसए येथे आयोजित केला जातो.नवीनतम फॅशन ट्रेंडचे वैशिष्ट्य असलेला,हा कार्यक्रम मेकअप आर्टिस्टना वेगवेगळ्या स्किन टोन,लिंग आणि वयोगट विविध मॉडेल्सवर काम करण्यासाठी एक विशिष्ट आव्हान देतो.“तेथे सर्व काही वेगवान असते, सलग आठ तास तिने आंतरराष्ट्रीय मॉडल्सचे मेकअप, केशरचना करत आपल्या हुशारीची चमक दाखवली आहे.
पुढचे ध्येय लॅक्मे फॅशन : तेजलला तिच्या अनुभवाबद्दल विचारले असता म्हणाली, एका क्षणी मी एका दहा वर्षांच्या गोरी त्वचेवर काम करत आहे आणि पुढच्या क्षणी मी एका मध्यमवयीन मॉडेलवर काम करत आहे.गडद त्वचा पॅलेट ,संक्रमणाशी कमी वेळेत जुळवून घ्यावे लागते . NYFW जगभरातील डिझायनर आणि फॅशन टाइकून यांना आकर्षित करते आणि कौशल्ये दाखवण्यासाठी आणि शिकण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. पुढील वर्षी लॅक्मे फॅशन ( Lakme Fashion Week ) काम करणे हे तेजलचे पुढील ध्येय आहे,जो मुंबईत आयोजित भारताचा स्वतःचा फॅशन इव्हेंट आहे.