ETV Bharat / city

चारचाकीला दे धक्का! इंधन दरवाढीविरोधात एनएसयुआय रस्त्यावर - गॅस

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन व घरगुती गॅस दरवाढ झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेसकडून द्वारका येथील पेट्रोल पंपावर चार चाकीला धक्कामार आंदोलन करुन निषेध नोंदविण्यात आला.

चारचाकीला दे धक्का, इंधन दरवाढीविरोधात एनएसयुआय रस्त्यावर
चारचाकीला दे धक्का! इंधन दरवाढीविरोधात एनएसयुआय रस्त्यावर
author img

By

Published : Jul 13, 2021, 3:12 AM IST

नाशिक - केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन व घरगुती गॅस दरवाढ झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेसकडून द्वारका येथील पेट्रोल पंपावर चार चाकीला धक्कामार आंदोलन करुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी 'गो बॅक मोदी' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ
काँग्रेसकडून देशभरात इंधन दरवाढ व महागाई विरोधात आंदोलन केले जात आहे. शहर काँग्रेसने सायकल रॅली काढून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईविरोधात चूल पेटवत आंदोलन केले. त्यानंतर सोमवारी युवक काँग्रेसने चारचाकीला धक्का मार आंदोलन करुन महागाईविरोधात आंदोलन तापवले. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

चारचाकीला दोरखंडाने ओढत केला निषेध
पेट्रोलचे दर १०८ रुपये लिटरवर पोहचले आहे. डिझेलचे दर शंभरीपार जाण्याची चिन्हे आहेत. इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक खर्च वाढला असून जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. घरगुती गॅसचे दर ८२५ वर पोहचले असून सामान्यांचे जगणे मुश्किल झाले असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी करत चार चाकीला दोरखंडाने ओढत महागाईचा निषेध नोंदवला आहे. या वेळी मोदी सरकार गो बॅक, मोदी सरकारचा धिकार असो असे, नारे देण्यात आले. तसेच यावेळी पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

हेही वाचा - खळबळजनक विधान अंगाशी; नाना पटोले यांच्यावर घुमजावची ओढवली नामुष्की

हेही वाचा - महाराष्ट्र कोरोनाची राजधानी तर ठाकरे सरकार रक्त पिपासु-भ्रष्टाचारी; आशिष शेलार यांची जहरी टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.