ETV Bharat / city

गुन्हेगार कितीही मोठा असला तरी पोलीस त्याला शोधून काढतील - शिवसेना खासदार संजय राऊत - Sanjay Raut react on Nitesh Rane

महाराष्ट्राची संस्कृती आणि कायदे नागरिकांना चांगलेच माहिती आहेत. महराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी, पोलीस त्याला शोधून काढतील, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut) यांनी नाव न घेता नितेश राणे यांना टोला लगावला आहे.

Sanjay Raut on Nitesh Rane
संजय राऊत
author img

By

Published : Dec 29, 2021, 7:58 PM IST

नाशिक - महाराष्ट्राची संस्कृती आणि कायदे नागरिकांना चांगलेच माहिती आहेत. महराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी, पोलीस त्याला शोधून काढतील, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut) यांनी नाव न घेता नितेश राणे यांना टोला लगावला आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

माहिती देताना खासदार संजय राऊत

हेही वाचा - Helmet Compulsory In Nashik : दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट सक्ती; "अन्यथा 18 जानेवारीपासून..."

राष्ट्रपती काय गोट्या खेळतात का?

सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केला होता की, हे सरकार आम्ही बदलू अन्यथा मी नाव बदलेन, यावर बोलताना राऊत यांनी मुनगंटीवारांवर शरसंधान साधले. राऊत म्हणाले की, सरकार बरखास्त करणे काय पोरखेळ आहे काय? राष्ट्रपती का तुमच्या घरी गोट्या खेळतात का? की त्यांच्या घरी जाऊन तुम्ही धुनिभांडी करतात? की राष्ट्रपती यांचे बरखास्तीचे रबर स्टॅम्प तुम्ही घरी आणून ठेवलेत, आशा तीव्र शब्दात राऊत यानी मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. मुनगंटीवार यांनी आता नाव बदलावेच, असा इशारा देखील राऊत यांनी मुनगंटीवार यांना दिला.

हेही वाचा - Difficulty in marriage Corona new restrictions : कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे वधू-वर कुटुंबांची धावपळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.