ETV Bharat / city

नाशिक : गॅस सिलेंडरच्या भडक्यात होरपळलेल्या आईचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी - Archana Singh died gas cylinder explosion nashik

गॅस सिलिंडरच्या भडक्यात होरपळलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेत महिलेची मुलगी देखील भाजल्या गेली आहे. ही घटना सातपूर येथील राधाकृष्णनगरमधील सरोदे संकुलमध्ये राहणाऱ्या सिंह यांच्या घरी घडली.

Fire
आग
author img

By

Published : Apr 21, 2022, 9:13 AM IST

नाशिक - गॅस सिलिंडरच्या भडक्यात होरपळलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेत महिलेची मुलगी देखील भाजल्या गेली आहे. ही घटना सातपूर येथील राधाकृष्णनगरमधील सरोदे संकुलमध्ये राहणाऱ्या सिंह यांच्या घरी घडली. अर्चना ललेंद्र सिंह (वय 40) असे मृत महिलेचे नाव असून हस्ता ललेंद्र सिंह (वय 16) उपचार घेत असलेल्या मुलीचे नाव आहे.

हेही वाचा - Smart City Scheme Nashik : नाशिकमधील स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याचा हालचाली, निविदा काढण्यास मनाई

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी 10 वाजेच्या सुमारास अर्चना ललेंद्र सिंह (वय 40) या स्वयंपाक करत असतांना गॅस नळीमधून गॅस लिकेज होऊन अचानक आगीचा मोठा भडका झाला. त्यामुळे आगीत अर्चना या 75 टक्के भाजल्या गेल्या. त्यांना उपचारासाठी अस्वस्थ अवस्थेत नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. आगीत मुलगी हस्ता ललेंद्र सिंग (वय 16) ही देखील 20 टक्के भाजली गेली. तिला अशोकनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अर्चना यांचे पती ललेंद्र सिंह यांनी आगीतून दोघींना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अर्चना या घाबरल्याने आगीतून बाहेर पडण्यास हिंमत दाखवत नव्हत्या, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - Private Schools Fees Nashik : खासगी शाळांच्या शुल्क वाढीमुळे पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा शासकीय शाळांकडे कल

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.