ETV Bharat / city

Mobile Loan App : लोन अ‍ॅपचा ट्रॅप, हफ्ते चुकवल्यास अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; नाशिकात 27 तक्रारी दाखल

author img

By

Published : Jun 3, 2022, 8:25 PM IST

सोशल मीडियावर वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन आणि विनातारण पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज ( Mobile Loan App ) देत ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार वाढतं आहे.

nashik cyber police
nashik cyber police

नाशिक - सोशल मीडियावर वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन आणि विनातारण पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देत ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार ( Mobile Loan App ) वाढतं आहे. 50 हजारांच्या कर्जासाठी 20 हजारांपर्यंत प्रोसेसिंग फी घेतली जात असून, हफ्ते चुकवल्यास कर्जदाराचे मॉर्फिंग केलेले अश्लील फोटो व्हायरल करत बदनामी केली जात आहे. याबाबत आतापर्यंत 27 तक्रारी नाशिकच्या सायबर पोलिसांत दाखल झाल्या ( 27 Complaints register against nashik cyber police ) आहेत.

असे केले जाते ब्लॅकमेल - नागरिक कर्ज घेताना आधार, पॅनकार्ड आणि बँकेची माहिती ऑनलाईन देतात. अधिक रक्कम उकळण्यासाठी कर्जदाराला ब्लॅकमेल केले जाते. कर्जदाराचे फोटो मॉर्फिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करत बदनामी केली ( Mobile Loan App Threat make pornographic photos viral ) जाते.

पोलीस उपायुक्त संजय बारकुंड माहिती देताना

मोबाईलच्या डाटाचा ब्लॅकमेलसाठी वापर - ऑनलाइन कर्ज घेताना कर्जदाराला लिंक पाठवली जाते. त्यामाध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश ( एक्सेस ) मागितला जातो. त्यामुळे तुमच्या फोन मधील मॅसेज, फोटो, नंबर कर्ज देणाऱ्याकडे जातो. जर, ग्राहकाने कर्ज थकवले तर त्याच्या संपर्कातील सर्व मित्र आणि नातेवाईकांना माहिती शेअर केली जाते. तुम्ही फ्रॉड असून तुमच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नका, असे सांगितले जात धमकी देण्यात येते.

कशी घ्याल काळजी - मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंक, मेसेजचा प्रतिसाद देऊ नका. अशा लिंक डिलीट करा. आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. शक्यतो ऑनलाइन कर्ज घेऊ नका. कर्ज घ्यायचे असल्यास ते बँक किंवा पतसंस्था मधूनच घ्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली आहे.

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी - मला ई-मेलवर लिंक पाठवत कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त केलं. 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी माझ्याकडून 3 हजार रुपये प्रोसेसिंग फी घेतली. काही दिवसांतच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला. फोनवर दमदाटी करत तुमचे फोटो मॉर्फिंग केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी महिती एका तक्रारदारांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे.

1 लाखाला गंडा - मला 2 लाख रुपयांची गरज होती. याचदरम्यान माझ्या मोबाईलवर ऑनलाईन कर्जासाठी एक लिंक आली. संबंधित ऑनलाइन कर्जासाठी प्रोसेसिंग फी 3 हजार रुपये घेतले. यावेळी फोन आला की तुमचे कर्ज नामंजूर झाले आणि दुसरी लिंक पाठवली आहे. अशा प्रकारे वीस ते पंचवीस लिंकवर सुमारे एक लाख प्रोसेसिंग फी घेत माझी फसवणूक झाल्याचे एका कर्जदारांने सांगितलं.

या अ‍ॅप पासून सावधान - लोन गो, कॉइन रुपी, फोर पे, इनकम, कॅश कोला, यूपीए लोन, एक्सप्रेस लोन, फर्स्ट कॅश, फर्स्ट रुपी, भारत कॅश, अपना पैसा, क्रेजी कॅश, लोन क्यूब, स्काय लोन, मोअर कॅश, अशा प्रकारच्या 3 हजार हुन अधिक अॅप आहेत. ज्यांचा डाटा महाराष्ट्र सायबर क्राईमने गुगलकडे पाठवला आहे. हे फेकअ‍ॅप बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Sachin Vaze : माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेला न्यायालयाने घातल्या 'या' अटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.