ETV Bharat / city

Nashik Sahitya Sanmelan : अभिजात भाषेच्या दर्जाकरिता १२ कोटी जनता राष्ट्रपतींना पत्र पाठवणार- सुभाष देसाई - नाशिक मराठी साहित्य संमेलन

उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Industry Minister Subhash Desai ) म्हणाले, की मराठी भाषा अभिजात असल्याचा अहवाल केंद्राच्या भाषा समितीला देण्यात आला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. साहित्य संमेलनातील अभिजात भाषा दालन ( Abhijat Bhasha QR code in Sahitya Sanmelan ) प्रदर्शनात क्यूआर कोडदेखील आहे.

अभिजात दर्जाबाबत माहिती देताना मंत्री सुभाष देसाई

author img

By

Published : Dec 3, 2021, 3:17 PM IST

Updated : Dec 3, 2021, 4:03 PM IST

नाशिक - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ( classical language status for Marathi ) ही चळवळ होणे आवश्यक आहे. त्यासाठी १२ कोटी मराठी जनता राष्ट्रपतींना पत्र पाठविणार ( 12 crore letters to president for classical language status ) असल्याची माहिती मराठी भाषा नियामक मंडळाचे उपाध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते अखिल भारतीय ९४ व्या मराठी साहित्य संमेलनातील मराठी भाषा दालनाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलत होते.

अभिजात दर्जाबाबत माहिती देताना मंत्री सुभाष देसाई

उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Industry Minister Subhash Desai ) म्हणाले, की मराठी भाषा अभिजात असल्याचा अहवाल केंद्राच्या भाषा समितीला देण्यात आला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. साहित्य संमेलनातील अभिजात भाषा दालन ( Abhijat Bhasha QR code in Sahitya Sanmelan ) प्रदर्शनात क्यूआर कोडदेखील आहे. तो स्कॅन केल्यास थेट राष्ट्रपतींना पत्र जाईल, असे देसाई यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-Marathi Sahitya Sammelan - 93 वर्षांत प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बाल मेळाव्याचे आयोजन

केवळ केंद्र सरकारची मान्यता बाकी-

दक्षिणेतील चार भाषा तसेच उडिया आणि संस्कृत या सहा भाषांप्रमाणेच मराठी भाषा अभिजाततेच्या दर्जाला पात्र आहे. त्याबाबत संबंधित तज्ज्ञ समितीकडे दिलेले सर्व पुरावे ग्राह्य मानून मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याची शिफारस ( Minister Subhash Desai on classical language status ) केंद्र सरकारकडे समितीने केलेली आहे. त्यामुळे केवळ केंद्र सरकारची मान्यता मिळवून हा टप्पा बाकी असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-Marathi Sahitya Sammelan मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील, तर जावेद अख्तर प्रमुख पाहुणे

अभिजात दर्जासाठीचे निकष

एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी त्या भाषेला दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असणे आवश्यक आहे. प्राचीन साहित्यिक नोंदींसह त्या भाषेचे साहित्य हे मूळ असावे आणि दुसऱ्या भाषेतून घेतलेले नसावे असे निकष सरकारने ठरविलेले आहेत. तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे.

साहित्य संमेलनाला सुरुवात-

कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात आज ( शुक्रवारी ) भव्य ग्रंथ दिंडीने ( Marathi Sahitya Sammelan begins in Nashik ) करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पूजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

हेही वाचा-94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : कार्यक्रम पत्रिका जाहीर; श्रोत्यांना अनेक सेलिब्रिटींना ऐकण्याची संधी

Last Updated : Dec 3, 2021, 4:03 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.