ETV Bharat / city

नाशिक शहरातील संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवा - दादा भुसे - विश्वास नागरे पाटील

शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून, याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना या संदर्भात आढावा घेण्याचे आदेश दिले होते. ठाकरेंच्या सूचनेनुसार, दादा भुसे यांनी नाशिक महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बैठक घेतली.

minister dadaji bhuse meeting with nmc and police commissioner on Covid-19
नाशिक शहरातील संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवा, दादा भुसे यांचे निर्देश
author img

By

Published : Jun 18, 2020, 11:21 AM IST

नाशिक - शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून, याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना या संदर्भात आढावा घेण्याचे आदेश दिले होते. ठाकरेंच्या सूचनेनुसार, दादा भुसे यांनी नाशिक महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बैठक घेतली. यात त्यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे निर्देश तसेच महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवावे, त्याच बरोबर खासगी दवाखाने व रुग्णालयांमध्ये देखील आवश्यक त्या व्यवस्था करुन नागरिकांना वेळेवर उपचार मिळतील, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बैठकीतील दृश्य...

राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर, आता नाशिक शहरात कोरोनाचे रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर, शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मालेगावात कोरोना नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कृषीमंत्री भुसे यांना नाशिकमध्ये लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार भुसे यांनी नाशिक महापालिकेला भेट देऊन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे व पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिक शहराच्या कोविड रुग्णांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी आयुक्त गमे यांनी शहरातील कोरोना रुग्ण, त्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. वाढती संख्या लक्षात घेऊन मनपाची आरोग्य सेवा सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यासाठी महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज ठेवून त्याचबरोबर खासगी दवाखाने व रुग्णालयांमध्ये देखील आवश्यक त्या व्यवस्था करुन नागरिकांना वेळीच उपचार द्यावे, अशा सूचना मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.

हेही वाचा - भाईचा बर्थ डे रस्त्यावर, कारचा हॉर्न वाजवल्याचा रागातून टोळक्याने केला युवकाचा खून..

हेही वाचा - चार वर्षीच्या मुलास सोडून पत्नी मित्रासोबत पळून गेल्याने पतीची आत्महत्या, सटाण्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.