नाशिक - गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेच. याची नाशिक शहर परिसरात तयारी सुरू झाली आहे. अशातट विक्रेते आणि कारागिरही मागे राहिलेले नाहीत. (Markets sell off for Navratri festival) नवरात्र उत्सवात लागणारे मातीचे घट बाजारात दाखल झाले असून अनेक कारागीर यावर नक्षीकाम करून अखेरचा हात फिरवत आहेत.
नक्षीकाम केलेले घट बनवले - मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरामध्ये देखील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसात घरोघरी 9 दिवस देवीच्या घटाची स्थापना केली जाते,यंदा बाजारात लाल, काळ्या रंगाच्या घटा सोबत आकर्षक नक्षीकाम केलेले घट दिसून येत आहे, नाशिकच्या मालेगाव स्टँड इथल्या दुकानांमध्ये पारंपरिक घटा सोबत नक्षीकाम केलेले घट बनवले जात असून,मातीच्या घटावर नक्षीकामाचा अखेरचा हात कारागीर फिरवत आहे,100 ते 2500 रुपयांपर्यंत या घटाच्या किमती असल्याचे दुकानदार सांगतात.
घटस्थापना म्हणजे काय - शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतात सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा केली जाते. आश्विन महिन्यात नवरात्रोत्सवात घरोघरी घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते.