ETV Bharat / city

'महाराष्ट्र बंद' राजकीय हेतूनेच - गिरीश महाजन

उत्तरप्रदेशात झालेल्या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंद वर आपली भूमिका व्यक्त करताना भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी हा बंद केवळ राजकीय हेतूने केला जात आहे, असा आरोप केला आहे. गिरीश महाजन हे नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

'Maharashtra Bandh' for political purposes only - Girish Mahajan
'महाराष्ट्र बंद' राजकीय हेतूनेच - गिरीश महाजन
author img

By

Published : Oct 10, 2021, 8:53 PM IST

नाशिक - उत्तरप्रदेशच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. व्यापारी कोरोनामुळे आधीच त्रस्त झाले आहेत, अशावेळी महाराष्ट्र बंदच्या राजकीय हाकेला कोणी साथ देणार नाही, असा विश्वास नाशिक दौऱ्यावर आलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

'महाराष्ट्र बंद' राजकीय हेतूनेच - गिरीश महाजन

राज्यातील शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, हे दुर्दैव -

ओबीसी जागर अभियान संदर्भात एन.डी. पटेल रोडवरील वसंत स्मृती कार्यालयात आयोजीत बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शरद पवार ज्येष्ठ नेते असूनही राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात अजून सरकारने कोणालाही एक दमडीचीही मदत केली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहेत. राज्यातील अनेक सहकारी बँका डबघाईला आलेल्या आहेत. जळगाव जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी मी आणि नाथाभाऊ एकत्र आलो आहेत. सर्व पक्षांना बरोबर घेऊन बँक निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे.

आयकर विभागाकडून सत्यता समोर येईल -

शरद पवार उत्तर प्रदेशच्या घटनेबद्दल बोलले आणि त्यानंतर लगेच अजित पवार यांच्या नातेवाईकाची आयकर विभागाने धाडी पडल्या या आरोपांचे महाजन यांनी खंडन केले आहेत. अजित पवार स्वतः म्हटले आहेत की पाहुणे जाऊ द्या नंतर बोलू. यासंदर्भात जे काही सत्य असेल ते समोर येणार आहेत.

आर्यन खान प्रकरणी राजकारण नको -

ड्रग्सच्या बाबतीत एनसीबीने एवढा पुढाकार घेतला आहे. यात राजकारण आणणे चुकीचे आहे. शेतकरी असो किंवा इतर कुठलाही मुद्दा असला की त्यात राजकारण आणायचे हे या सरकारने ठरविलेले दिसत आहेत. महाविकास आघाडीने ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडले, महाविकास आघाडीच्या निष्क्रीयतेमुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले आहे, असे महाजन यांनी या वेळी सांगितले.

खडसे काठावर निवडून यायचे -

एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खूप बहुमत होते असे काही नव्हते पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते. कोणाला दोष देऊन उपयोग नाही. कधी फडणवीस तर कधी माझ्यामुळे पराभव झाला असे ते म्हणतात. दोन वर्षानंतर त्यांना आता कळले की मी त्यांना पाडले आहे, असे महाजन म्हणाले आहेत.

हेही वाचा - उद्या महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.